विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना भविष्याचा विचार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:25 AM2019-03-17T00:25:38+5:302019-03-17T00:27:17+5:30
तळमळीने व चिकाटीने कार्य करणाऱ्या तीन पिढ्यांच्या योगदानामुळे दुर्गम आदिवासी भागातील एक शैक्षणिक कार्य उभी करणारी संस्था म्हणजे डांग सेवा मंडळ संस्था आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्रीराम गीत यांनी केले.
पंचवटी : तळमळीने व चिकाटीने कार्य करणाऱ्या तीन पिढ्यांच्या योगदानामुळे दुर्गम आदिवासी भागातील एक शैक्षणिक कार्य उभी करणारी संस्था म्हणजे डांग सेवा मंडळ संस्था आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्रीराम गीत यांनी केले. दिंडोरीरोडवरील नाथकृपा लॉन्स येथे डांग सेवा मंडळ यांच्या वतीने स्व. दादासाहेब बिडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अभिवादन, चरित्र ग्रंथ प्रकाशन व पुरस्कार सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी गीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या कार्यक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधीर तांबे, राजहंस प्रकाशनचे प्रकाशक दिलीप माजगावकर, विनया खडपेकर, मनोजकुमार देशमुख, अनिल देठणकर, मनोज तिबडेवाला आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना गीत यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींच्या अपेक्षा काय शिकायचे, कधी शिकायचे आणि शिक्षण घेऊन काय करायचे याबाबत भविष्याचा विचार करावा तसेच कौशल्य विकास व आपल्या चुका सुधारण्यासाठी भरपूर वाव आहे, असे सांगून नेमके बोलणे नियोजित बोलणे याविषयी मार्गदर्शन केले.
व्यासपीठावरून बोलताना खडपेकर यांनी संस्थेने व संस्थाचालकांनी केलेल्या कार्याची फक्त दखल न घेता त्यांच्यातील चिकाटी हा गुण त्यांनी आदिवासींच्या शिक्षण व आरोग्य सेवेला वाहून घेतला आहे. आज पुढची पिढी हा सेवेचा वसा संस्था पुढे नेत आहे. संस्थेला शासनाचे अनुदान मिळते, परंतु संस्थेच्या कार्याचा व्याप अतिशय कष्टप्रद व खर्चिक
आहे.
यावेळी दादासाहेब बिडकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. नरेंद्र पाटील, बी. आर. भामरे, पी. पी. जाधव, अनिल घरटे, आर. पी. पगारे, यमुनाबाई मोरे, नाना बागुल, कलाबाई मालखेडे आदींना मान्यवरांच्या हस्ते आदर्श सेवक पुरस्कार प्रदान करण्यात येऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्रीमती हेमलता बिडकर यांनी केले. याप्रसंगी संस्थेच्या शुभम पवार, अमिषा पेठकर, प्रतीक पवार, योगीता ब्राह्मणे, भागवत वार्डे, लता कुरकुते, नूतन भोये, अश्विनी भालेराव अशा २८ विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्र माप्रसंगी श्रीमती मृणाल जोशी, अण्णासाहेब मराठे, दामू ठाकरे, प्रभाकर पवार, पीयूष पारेख, लक्ष्मण ठाकरे, रवींद्र जाधव, कमलेश शेलार, विलास खैरनार, जितेंद्र सूर्यवंशी, किसन बागुल, आदींसह संस्थेचे पदाधिकारी सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी यांनी केले.
दिलीप माजगावकर यांनी संस्थाचालक व संस्थेला शासनाने व विद्यापीठाने तसेच विविध संस्थांचे मिळालेले पुरस्कार आणि दादासाहेबांच्या कार्य व कर्तृत्वाबद्दल अभिमान असल्याचे सांगितले. तसेच चांगल्या कार्याला सहकार्याचा हात अपेक्षित असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितल.