विद्यार्थ्यांनी कलागुण जोपासावेत : प्रवीण जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 01:13 AM2019-12-31T01:13:00+5:302019-12-31T01:14:26+5:30
विद्यार्थ्यांनी कलागुण जोपासावेत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रवीण जोशी यांनी केले. संस्थेच्या विविध शाळांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
नाशिकरोड : विद्यार्थ्यांनी कलागुण जोपासावेत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रवीण जोशी यांनी केले. संस्थेच्या विविध शाळांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
के. जे. मेहता हायस्कूल व इ. वाय. फडोळ कॉलेज, के. एन. केला महिला महाविद्यालय, एस. एम. जोशी अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गणपतराव मुठाळ होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते, संस्थेचे सचिव प्रवीण जोशी, खजिनदार मिलिंद पांडे, प्राचार्य प्रकाश झेंडे , पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा नंदिनी आहिरे, उपप्राचार्या कल्पना रकिबे, प्रशालेचे माजी प्राचार्य रमेश जोशी, सुधाकर चोपडे, पर्यवेक्षक दशरथ जारस, संजय सूर्यवंशी, उपप्राचार्य संजय शिंदे, कांतीलाल नेरे, सपना पांडे, मंदाकिनी मुठाळ, प्रा. इंदुमती भोर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांची समयोचित भाषणे झाली.