विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करावे : महेश झगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:23 AM2018-10-30T00:23:48+5:302018-10-30T00:24:58+5:30

विद्यार्थ्यांना मुळापासून शिकविले पाहिजे की जेणेकरून त्यांचा पाय खोल होईल व त्यांना सखोल ज्ञान प्राप्त होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांमध्ये आत्मपरीक्षण करून स्वत:ची प्रगती करण्याची जिद्द, चिकित्सक वृत्ती वाढविण्यास प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.

 Students should do self-examination: Mahesh Jigade | विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करावे : महेश झगडे

विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करावे : महेश झगडे

Next

नाशिक : विद्यार्थ्यांना मुळापासून शिकविले पाहिजे की जेणेकरून त्यांचा पाय खोल होईल व त्यांना सखोल ज्ञान प्राप्त होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांमध्ये आत्मपरीक्षण करून स्वत:ची प्रगती करण्याची जिद्द, चिकित्सक वृत्ती वाढविण्यास प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती रंगुबाई जुन्नरे हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्र माप्रसंगी महेश झगडे बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष व संस्था उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके होते. यावेळी प्रमुख अतिथी उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, कार्यवाह राजेंद्र निकम, शिक्षक मंडळ अध्यक्ष लक्ष्मण जाधव, उपाध्यक्ष दिलीप अहिरे, सचिन महाजन, वैशाली बालाजीवाले, नंदा पेटकर, डॉ. कैलास कमोद उपस्थित होते. यावेळी झगडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात थोर पुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी. तरच जीवनात यशस्वी होता येते. कार्यक्रमास कार्यकारी मंडळ सदस्य चंद्रशेखर वाड, भास्करराव कोठावदे, सरोजिनी तारापूरकर, विलास देशपांडे, शिक्षणाधिकारी शैलेश पाटोळे, एकनाथ कडाळे, सरिता देशपांडे, सुभाष सूर्यवंशी, आनंद सोनवणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य नंदा पेटकर यांनी केले, सूत्रसंचालन चौधरी यांनी करून दिला. यावेळी आदींसह शिक्षक, कर्मचारी, पालक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title:  Students should do self-examination: Mahesh Jigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.