विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची कास धरावी : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:50 PM2019-12-29T23:50:30+5:302019-12-29T23:50:50+5:30

काजीसांगवी : विद्यालयात एकूण ३१८ दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

Students should face competition test: Patil | विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची कास धरावी : पाटील

चांदवड तालुक्यातील काजीसांगवी येथे महाराजस्व अभियानांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप करताना तहसीलदार प्रदीप पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी.

Next

काजीसांगवी : विद्यालयात एकूण ३१८ दाखल्यांचे वाटप करण्यात आले. शासनाच्या माध्यमातून तालुक्यातील शाळांमध्ये ही योजना राबविण्यात येत असल्याचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सांगितले. शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत विविध शासकीय दाखल्यांच्या वाटपप्रसंगी ते बोलत होते. दहावी आणि बारावीनंतर विद्यार्थ्यांना सदर दाखल्यांची गरज निर्माण होते. वेळेवर दाखले उपलब्ध न झाल्यास विद्यार्थी मिळणाऱ्या संधीपासून वंचित राहू शकतात. त्यासाठी दाखल्यांची पूर्तता अगोदरच करून ठेवली असेल तर वेळेवर विद्यार्थी व पालक यांची धावपळ होणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. मंडळ अधिकारी आर.एस. देशमुख, प्राचार्य मधुकर हांडगे, सरपंच साहेबराव सोनवणे, गंगाधर ठाकरे, वसंतराव ठाकरे, श्रीमती सोनवणे, गुरव, पंकज ठाकरे उपस्थित होते.

Web Title: Students should face competition test: Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.