विद्यार्थ्यांनी सामाजिक हित जपावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 10:24 PM2019-12-26T22:24:56+5:302019-12-26T22:29:07+5:30

महाविद्यालयीन युवकांना दिशा देण्याची आवश्यकता आहे. त्यांनी स्वावलंबी होणे गरजेचे आहे त्यांच्या सामाजिक जाणिवा विकसित करणे गरजेचे आहे. या जाणिवा विकसित होण्यास राष्टÑीय सेवा योजनेची शिबिरे अतिशय उपयुक्त आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वहितापेक्षा सामाजिक हित जपावे, समाजाच्या हिताचातच आपले हित आहे याची जाणीव स्वयंसेवकांना असली पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजना खरोखरच आजच्या तरुण पिढीला एक नवी प्रेरणा नवी दिशा देणारी असल्याचे प्रतिपादन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले.

Students should maintain social interest | विद्यार्थ्यांनी सामाजिक हित जपावे

सिन्नर महाविद्यालयाच्या राष्टÑीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार. व्यासपीठावर हेमंत वाजे, डॉ. दिलीप शिंदे, मेघराज आव्हाड, आर. व्ही. पवार, रामहरी खताळ आदी.

Next
ठळक मुद्देनीलिमा पवार : सिन्नर महाविद्यालयाचे राष्टÑीय सेवा योजनेचे पाटोळे येथे हिवाळी शिबिर





सिन्नर : महाविद्यालयीन युवकांना दिशा देण्याची आवश्यकता आहे. त्यांनी स्वावलंबी होणे गरजेचे आहे त्यांच्या सामाजिक जाणिवा विकसित करणे गरजेचे आहे. या जाणिवा विकसित होण्यास राष्टÑीय सेवा योजनेची शिबिरे अतिशय उपयुक्त आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वहितापेक्षा सामाजिक हित जपावे, समाजाच्या हिताचातच आपले हित आहे याची जाणीव स्वयंसेवकांना असली पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजना खरोखरच आजच्या तरुण पिढीला एक नवी प्रेरणा नवी दिशा देणारी असल्याचे प्रतिपादन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सिन्नर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने पाटोळे येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मविप्र चे संचालक हेमंत नाना वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन कार्यक्रमास व्यासपीठावर प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, पाटोळे गावचे सरपंच मेघराज आव्हाड, उपसरपंच रामहरी खताळे, उपप्राचार्य प्रा. आर. व्ही. पवार, डॉ. डी. एम. जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुनील सांगळे, संतुनाना कराड, रंगनाथ खताळे, ज्ञानेश्वर खताळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शस्त्रपूजन व राष्ट्रीय सेवा योजनेचा ध्वज फडकावून करण्यात आली. मान्यवरांनी प्रतिमापूजन करून कार्यक्र माची सुरु वात केली.
प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे प्रास्ताविक केले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाने मागील वर्षी केलेल्या कामाचा आढावा घेत यावर्षी कोण कोणत्या स्वरूपाची कामे केली जातील याचा आढावा घेतला. आज राष्ट्राला खरी गरज आहे ती एक सज्जन निष्ठावान युवकांची आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना आपल्या मनात निर्माण होणे गरजेचे आहे. प्रा. योगेश भारस्कर व डॉ. सुरेखा जाधव सूत्रसंचालन केले. एन.एस.एस. कार्यक्र म अधिकारी प्रा. सुनील कर्डक यांनी आभार मानले. यावेळी प्रा. आर. टी. सोनवणे, प्रा. एस. जी. भागवत, प्रा. अचट यांचे सहकार्य लाभले.
झाडे लावण्याचे आवाहन
पाटोळे गावचे सरपंच मेघराज आव्हाड यांनी सांगून स्वयंसेवकांनी मागील वर्षी केलेल्या कामाचे कौतुक केले. गावात रंगरंगोटी करणे, सुशोभिकरण करणे, शोष खड्डे खोदणे, वृक्षारोपण करणे तसेच गाव तळ्याचे सुशोभीकरणासाठी त्याच्या आजूबाजूला झाडे लावणे, अशी
प्रस्तावित कामे सांगितली. हेमंत वाजे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांचे सामाजिक भान वाढविण्यासाठी समाजहित शिक्षण सामाजिकमूल्य राष्ट्रीय मूल्य आणि सामाजिक आरोग्य इत्यादींचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

Web Title: Students should maintain social interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.