विद्यार्थ्यांनी आत्मिक बळावर पुढे जाण्याचा प्रयत्न करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:32 PM2019-12-13T23:32:05+5:302019-12-14T00:47:40+5:30

आपल्यातील आत्मिक बल पाहून प्रत्येकाने पुढे जाण्याचा प्रयत्न करावा कितीही अन्याय अत्याचार झाले तर सहन करण्याची क्षमता असायला पाहिजे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.

Students should strive for spiritual strength | विद्यार्थ्यांनी आत्मिक बळावर पुढे जाण्याचा प्रयत्न करावा

चाचा नेहरू बालमहोत्सवप्रसंगी पारितोषिक वितरण करताना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, उपायुक्त सुरेखा पाटील, बालकल्याण समिती अध्यक्ष शुभांगी बेलगावकर, शोभा पवार, मंगला नेहे, चंदूलाल शहा, अश्विनी नेहरकर आदी.

Next
ठळक मुद्देविश्वास नांगरे-पाटील : चाचा नेहरू बालमहोत्सवाचा समारोप

पंचवटी : आपल्यातील आत्मिक बल पाहून प्रत्येकाने पुढे जाण्याचा प्रयत्न करावा कितीही अन्याय अत्याचार झाले तर सहन करण्याची क्षमता असायला पाहिजे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.
स्व. मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात महिला व बालविकास विभाग अंतर्गत जिल्ह्यातील शासकीय स्वयंसेवी मान्यताप्राप्त संस्थेतील बालकांसाठी गुरुवारी चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या समारोपप्रसंगी नांगरे-पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
व्यासपीठावर विभागीय उपायुक्त सुरेखा पाटील, बालकल्याण समिती अध्यक्ष शुभांगी बेलगावकर, शोभा पवार, मंगला नेहे, ज्येष्ठ पत्रकार चंदूलाल शहा, अश्विनी नेहरकर उपस्थित होते. यावेळी बोलताना नांगरे-पाटील यांनी पुढे म्हटले की, आयुष्य जगताना किती त्रास झाला तरी मी पुढे जाण्याचा प्रयत्न करेन. प्रामाणिकपणे खऱ्या सत्यावर विश्वास ठेवणारा आहे हे लक्षात ठेवले पाहिजे, असे ते शेवटी म्हणाले. अनाथ निराधार निराश्रित मुलांमधील सुप्तगुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होणे गरजेचे आहे यासाठी चाचा नेहरू बाल क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचे
आयोजन केले होते. महोत्सवात नाच, गाणे, निबंध, कबड्डी, खो-खो, लांब उडी, गोळाफेक, उंचउडी, हस्ताक्षर, वक्तृत्व, चित्रकला, नृत्य, सामूहिक नृत्य आदी विविध स्पर्धा घेण्यात
आल्या या स्पर्धांचे पारितोषिक
वितरण नांगरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिता झेंडे यांनी केले कार्यक्रमाला योगीराज जाधव, गणेश कानवडे, एस. एस. सुसलादे, नितीन ताजनपुरे, नितीन निकाळजे, भूषण काळे आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Students should strive for spiritual strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.