सहा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी केली विधानभवनाची वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:10 AM2018-03-26T00:10:41+5:302018-03-26T00:10:41+5:30
विधानसभेच्या कामकाजाची शालेय विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, लोकप्रतिनिधींचा कामकाजातील सहभाग प्रत्यक्ष अनुभवता यावा यासाठी मालेगाव तालुक्यातील सहा महाविद्यालयांतील वीस विद्यार्थ्यांना विधानभवनाची वारी केली. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विद्यार्थ्यांना अधिवेशन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.
मालेगाव : विधानसभेच्या कामकाजाची शालेय विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, लोकप्रतिनिधींचा कामकाजातील सहभाग प्रत्यक्ष अनुभवता यावा यासाठी मालेगाव तालुक्यातील सहा महाविद्यालयांतील वीस विद्यार्थ्यांना विधानभवनाची वारी केली. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विद्यार्थ्यांना अधिवेशन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. विधानसभेमध्ये आपले लोकप्रतिनिधी विविध विषय कसे मांडतात.विविध विषयांवर चर्चा कशी घडून येते. याचे सतत कुतूहल असते; स्थानिक लोकप्रतिनिधी दादा भुसे याचा सहकार्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थेट विधानसभा व विधानपरिषद कामकाजाची प्रत्यक्ष माहिती मिळवण्याची संधी मिळाली आहे. यावेळी सत्ताधारी व विरोधी पक्षातील अनेक लोकप्रतिनिधींची भेट घेऊन विद्यार्थ्यांनी चर्चा केली. अजिंक्य भुसे विद्यार्थ्यांसमवेत होते. झोडगे, दाभाडी, करंजगव्हाण, मालेगाव येथील महाविद्याालयातील २० विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी जनता महाविद्यालयातील शिक्षक दीपक खोमणे, योगेश चव्हाण, राहुल वाघ, गोविंदा गायकवाड यांच्यासह दिनेश साळुंके, स्वप्नील शिसव उपस्थित होते.
मालेगाव तालुक्यातील सहा महाविद्यालयांतील वीस विद्यार्थ्यांनी विधानभवनाची वारी केली. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विद्यार्थ्यांना अधिवेशनाचे कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. लोकप्रतिनिधी दादा भुसे याचा सहकार्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थेट विधानसभा व विधानपरिषदेच्या कामकाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली.