विद्यार्थ्यांना लागली शाळेची आस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:18 AM2021-06-16T04:18:27+5:302021-06-16T04:18:27+5:30
गेल्यावर्षी कोरोनामुळे बंद झालेल्या जिल्ह्यातील शाळा मध्यंतरी काही दिवस सुरूही झाल्या होत्या; परंतु पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्याने शाळा-महाविद्यालये ...
गेल्यावर्षी कोरोनामुळे बंद झालेल्या जिल्ह्यातील शाळा मध्यंतरी काही दिवस सुरूही झाल्या होत्या; परंतु पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्याने शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली. आता कोरोनाची दुसरी लाटही मंदावली असून, प्रादुर्भावही कमी होऊ लागल्याचे सध्या चित्र आहे. नवीन रुग्णसंख्येतील घट आणि कोरोनामुक्तीचा वाढता टक्का याचे सातत्य असेच राहिले तर शाळांची घंटा पुन्हा वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनानेही निर्बंध सैल केल्याने बच्चे कंपनी अर्थात सर्व वयोगटातील विद्यार्थीही शाळेसाठी आसुसले आहेत.
जून महिन्याच्या १५ तारखेपासून साधारणपणे सर्व शाळा सुरू होतात. कोरोनाचे सावट असल्याने त्याची तीव्रता अजून कमी झाली तर उशिरानेही शाळा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यासह पालकांनी नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू केली असून, सुरू झालेल्या दुकानांमधून साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी, पालक गर्दी करत आहेत.