विद्यार्थिनींचे एमपीएससी परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:57 AM2019-09-03T00:57:38+5:302019-09-03T00:58:01+5:30
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांची अधिकारी पदासाठी निवड झाली. कविता दिगंबर पाटील हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांची अधिकारी पदासाठी निवड झाली. कविता दिगंबर पाटील हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास या विभागात अधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे. तसेच प्राशा प्रभाकर पगार हिने सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात रेंजर फॉरेस्ट अधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे. या दोन्ही विद्यार्थिनी मराठा हायस्कूलच्या हॅण्डबॉल खेळाच्या खेळाडू होत्या. या दोघी एम.पी.एस.सी.मध्ये क्र ीडा विभागात प्रथम आल्या. या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी मविप्र समाज संस्थेचे नाशिक ग्रामीण तालुक्याचे संचालक सचिन पिंगळे, मविप्र समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. संजय शिंदे, डॉ. नानासाहेब पाटील, चंद्रकांत शिंदे, मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक अरु ण पवार, मविप्रचे क्र ीडा अधिकारी प्रा. हेमंत पाटील उपस्थित होते.