सुरगाण्यातील विद्यार्थिनींना विषबाधारुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:04 AM2017-11-17T00:04:53+5:302017-11-17T00:08:51+5:30
सुरगाणा : तालुक्यातील माणी येथील आदिवासी विकास विभाग प्रकल्पांतर्गंत येणाºया कन्या आश्रमशाळेतील सहा मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी (दि. १६) घडली. शासकीय पोषण आहाराचे सेवन केल्यानंतर ही घटना घडली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
या संदर्भात अधिक वृत्त असे, माणी येथील कळवण आदिवासी विकास विभाग प्रकल्पातर्गंत येणाºया आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी खिचडी खाल्ल्याने त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जास्त त्रास झालेल्या गंभीर रुग्णांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रु ग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डॉ. मधुकर पवार, डॉ. मीनाक्षी जगताप, डॉ. लीना टाके यांनी विषबाधितांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान भाग्यश्री देशमुख हिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या आश्रमशाळेत ७७१ मुली निवासी असून, बोरपाडा येथील बंद करण्यात आलेल्या आश्रमशाळेतील दोनशे सहा मुलींचा त्यात समावेश आहे. घटनेचे वृत्त समजताच तहसीलदार दादासाहेब गिते, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, तालुका वैद्यकीय अधिकारी एच.के. नेहते यांनी आश्रमशाळेची पाहणी केली. मुलींमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण केवळ तीन ते चार टक्के आढळून आले. तसेच जेवणाचे ताट, स्वच्छ ठेवले जात नाही. आदि कारणामुळे त्यांना त्रास झाला असावा. अन्नाचे नमुने तपासणीसाठी नाशिक येथील फॉरेन्सिक प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर खरे कारण समजू शकेल, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी एच. के. नेहते यांनी दिली.
सुरगाणा व करंजुल आश्रम शाळेतील स्वच्छते विषयी दोन महिन्यांपुर्वी कळवण प्रकल्प अधिकाºयाकडे तक्र ार केली होती. त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही. वेळीच दखल घेतली असती तर ही वेळ आली नसती. या बाबत सखोल चौकशी करण्यात यावी.
- सुरेश गवळी - भाजप तालुका अध्यक्ष
विषबाधा झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून, दोषीवर कारवाई करावी, शासनाने स्वच्छते बाबतीत डोळेझाक करू नये, आदिवासी मुलांची हेळसांड थांबवावी. - जयश्री पवार जिल्हा परिषद सदस्याविषबाधा झालेल्या विद्यार्थिनीत कमल गोविंद भोये (११वी विज्ञान, रा. धामणकुंड), मनीषा काशीनाथ दळवी (९ वी, रा. अळीवपाडा), हेमलता रघुनाथ चौधरी (११ वी विज्ञान), भाग्यश्री दौलत देशमुख (९ वी, रा. अळीवपाडा), भाग्यश्री काशीनाथ दळवी (११ वी कला शाखा) यांच्यासह अन्य एका विद्यार्थिनींचा समावेश आहे. या शासकीय कन्या आश्रमशाळेत पाचशे विद्यार्थिनी सध्या शिक्षण घेत आहेत.