सीए परीक्षेत लागली विद्यार्थ्यांची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:18 AM2021-09-14T04:18:13+5:302021-09-14T04:18:13+5:30

नाशिक : सीए परीक्षेत नाशिकचा झेंडा कायमच उंचावत असतांना यंदा मात्र निकाल काहीसा कमी लागल्याने नाशिकचा सरासरी निकालही ...

Students took the CA exam | सीए परीक्षेत लागली विद्यार्थ्यांची कसोटी

सीए परीक्षेत लागली विद्यार्थ्यांची कसोटी

Next

नाशिक : सीए परीक्षेत नाशिकचा झेंडा कायमच उंचावत असतांना यंदा मात्र निकाल काहीसा कमी लागल्याने नाशिकचा सरासरी निकालही घसरला आहे. असे असले तरी प्रतिकूल वातावरणातही विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश महत्त्वपूर्ण मानले जात आहे. यंदा ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची कसोटी लागली.

जुलै २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम आणि फाऊंडेशन परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांचे यश उल्लेखनीय राहिले. दर्शन वाझट, साक्षी गायकवाड, गोपिका नागजी, खुशबू बुरड, ओमकार सोनवणे, आणि वैष्णवी शिंदे, राहुल गायधनी यांनी यश संपादन केले. यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणावर भर द्यावा लागला. परीक्षेबाबतची अनिश्चितता आणि निर्बंधाच्या सावटाखाली विद्यार्थ्यांनी अभ्यासातील सातत्यामुळे यश मिळविले.

देशात सर्वत्र अशीच परिस्थिती असल्यामुळे एकंदर निकालातही घसरण झाली आहे. देशात विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २६.६२ इतके आहे. गेल्या जुलै महिन्यात संपूर्ण भारतात ६९४ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती.

सीए अंतिम वर्षाच्या नवीन अभ्यासक्रमामध्येदेखील ९९८६ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच उत्तीर्णतेची टक्केवारी २०.२३ टक्के इतकी राहिली. दुसऱ्या ग्रुपमध्ये देशातील उत्तीर्णतेचे प्रमाण १७.३६ टक्के इतके राहिले. दोन्ही ग्रुपची परीक्षा एकाचवेळी दिलेल्या २३९८१ पैकी २८७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

--इन्फो--

ऑनलाईन शिक्षणामुळे यंदा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकण्याचा अनुभव मिळाला नाही. कोरोनाच्या प्रभावात विद्यार्थ्याना परीक्षा केंद्रांवर जावे लागले. त्यामुळे काहीशी धाकधूक विद्यार्थ्यांमध्ये असावी जी निकालातून दिसते. परीक्षा पुढे ढकलावी यासाठी काही विद्यार्थी कोर्टातही गेले होते. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. नाशिक जिल्ह्याचा निकाल समाधानकारक आहे.

- लोकेश पारख, सरचिटणीस, नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस चालक संघटना.

छायाचित्रे आर :

गोपिका मगजी

खुशबू बुरड

ओमकार सोनवणे, वैष्णवी शिंदे,

राहुल गायधनी

Web Title: Students took the CA exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.