विद्यार्थांना दुसऱ्या फेरीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:52 PM2020-10-06T23:52:16+5:302020-10-07T01:09:09+5:30
नाशिक : शहरासहा राज्यभरातील प्रमुख सहा प्रमुख महानगर क्षेत्रातील अकरावीची प्रवेश केंद्रीय आॅनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. कोविड -१९ संसर्गजन्य आजाराचे सावटाखाली होत असलेली ही प्रवेश प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या एसईबीसी आरक्षणासंदर्भातील आदेशामुळे स्थगित झाली असून नाशिक शहरातील विविध ६० उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीत प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थांना ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील विविध ६० महाविद्यालयांमध्ये आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून या प्रक्रियेत प्रथम फेरी पूर्ण झाली आहे. मात्र दुसरी फेरीची गुणवत्ता निवड यादी १० सप्टेंबर २००० रोजी जाहीर केली जाणार होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षण संदर्भात दिलेल्या स्थगितीच्या आदेशामुळे अकरावीची पुढील प्रवेश प्रक्रिया ही स्थगित करण्यात आली आहे. यासंदर्भात शासनाची आदेश प्राप्त झाल्यानंतरच पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश या संकेतस्थळावर स्पष्ट केले आहे त्यामुळे करणामुळे लांबलेली प्रवेश प्रक्रिया आणखीनच लांबली असून प्रथम फेरीत प्रवेशाची संधी मिळवू न शकलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवशासाठी दुसरी फेरी सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.
१७ हजार ८७ जागा रिक्त
नाशिक महानगर क्षेत्रातील विविध सात महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या २५ हजार २७० जागांपैकी अजूनही तब्बल१७ हजार ८७ जागा रिक्त आहेत. अकरावी प्रवेशासाठी जिल्हाभरातून ३१ हजार ४६० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार १८७ विद्यार्थ्यांनी पसंतीचे महाविद्यालय निवडण्याचा रकाना भरून आॅनलाइन अर्ज सबमिट केले होते. या सर्व विद्यार्थ्यांपैकी प्रथम फेरीत केवळ ८ हजार १८३ प्रवेश झाले असून सुमारे १५ विद्यार्थ्यांना दुसºया फेरीसाठी निवड यादी जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.