ज्येष्ठ नागरिक संघामुळे विद्यार्थ्यांचा उन्हाळा सुसह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 04:32 PM2019-03-09T16:32:02+5:302019-03-09T16:32:21+5:30
चिंंचलेखैरे : जि.प. शाळेला पंख्यांचे वाटप
घोटी : इगतपुरी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील चिंचलेखैरे येथील जिल्हा परिषद शाळेला जेष्ठ नागरिक संघाच्यावतीने पंख्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उन्हाळा सुसह्य ठरणार आहे.
कार्यक्र मास ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष आर.जी.परदेशी,उपाध्यक्ष पुरणचंद लुणावत,सदस्य रामचंद्रन नायर, व्ही. के. महाजन आदि उपस्थित होते. यावेळी आर.जी. परदेशी यांनी सांगितले, शहरी भागातील शाळांमध्ये पंख्यासारख्या सुविधा उपलब्ध असतात परंतु, आदिवासी भागातील मुलांनाही या सुविधा मिळाव्यात व ऐन उन्हाळ्यात मुलांना रखरखत्या ऊन्हाच्या झळांपासून आराम व थंड हवा मिळावी यासाठी शाळेला चार पंखे देण्याची कल्पना पुढे आली. शाळेत पंखा लागणार असल्याने या वेळी मुलांच्या चेहऱ्यावर आंनद पसरला होता. सर्व मुलांना संघाच्यावतीने खाऊचे वाटप करण्यात आले. तर लवकरात लवकर खैरेवाडी शाळेला पिण्याच्या पाण्यासाठी टाकी देणार असल्याचे जेष्ठ नागरिक संघाचे व्ही.के.महाजन यांनी सांगितले. या वेळी मुख्याध्यापक निवृत्ती ताळपडे,प्रशांत बाबळे,भाग्यश्री जोशी,हौशीराम भगत, नामदेव धाडवड आदी शिक्षकांनी जेष्ठ नागरिक संघाचे आभार मानले.