विविध दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 05:55 PM2019-06-23T17:55:16+5:302019-06-23T17:55:29+5:30

सिन्नर : दहावी-बारावीनंतर पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी प्रमाणपत्रे, दाखले यासाठी होणारी गैरसोय टाळण्याच्या हेतूने जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या पुढाकारातून माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे.

Students will be hiking to get various certificates | विविध दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ थांबणार

विविध दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ थांबणार

Next

सिन्नर : दहावी-बारावीनंतर पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी प्रमाणपत्रे, दाखले यासाठी होणारी गैरसोय टाळण्याच्या हेतूने जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या पुढाकारातून माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे.
दहावी - बारावीच्या परिक्षांचे नुकतेच निकाल लागले असून शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. शाळा-महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे उत्पन्नाचा दाखला, डोंगरी प्रमाणपत्र, नॉन क्रिमलेअर, जातीचा दाखला, शेतकरी दाखला, प्रकल्पग्रस्त दाखला, वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यासह आवश्यक कागदपत्र जमविताना विद्यार्थ्यांसह पालकांची तारंबळ होते. तहसीलदार कार्यालयात असलेल्या सेतूमध्ये दाखले मिळविण्यासाठी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थी, पालकांना दिवसभर ताटकळत थांबावे लागते, याउपरही कागदपत्रे एका दिवसात मिळतीलच याची शाश्वती नसते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची संभावना अधिक असते. ही सर्व गैरसोय टाळण्याच्या हेतूने जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्र उपलब्ध करु न देण्यासाठी माजी आमदार कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरु केले आहे. या केंद्रच्या शुभारंभाप्रसंगी माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, माजी नगरसेवक हर्षद देशमुख, पांडुरंग वारूंगसे, सुनील नाईक, कृष्णा कासार, प्रशांत सोनवणे, प्रविण कोकाटे, शिवा वाणी, काळू खताळे आदींसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे सुविधा केंद्र दररोज सकाळी ९ते सायंकाळी ५ पर्यंत सर्वांसाठी खुले असून प्रवेश प्रक्रि या पुर्ण होईपर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी दिली.

Web Title: Students will be hiking to get various certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.