विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, खाऊ देऊन होणार स्वागत ; सोमवारी भरणार शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 03:30 PM2019-06-16T15:30:27+5:302019-06-16T15:34:03+5:30
नवा कोरा गणवेश, खांद्यावर नवे दप्तर आणि नव्या वर्गाबद्दलची चेहºयांवर न लपणारी उत्सुकता अशा उत्साहपूर्ण वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षात शाळेची सोनवा कोरा गणवेश, खांद्यावर नवे दप्तर आणि नव्या वर्गाबद्दलची चेहºयांवर न लपणारी उत्सुकता अशा उत्साहपूर्ण वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षात शाळेची सोमवारी (दि.१७) पहिली घंटा वाजणार असून गेल्या दीड महिन्यांपासून शांत असलेले शाळांची प्रांगणे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहेत. मवारी (दि.१७) पहिली घंटा वाजणार असून गेल्या दीड महिन्यांपासून शांत असलेले शाळांची प्रांगणे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहेत.
नाशिक : नवा कोरा गणवेश, खांद्यावर नवे दप्तर आणि नव्या वर्गाबद्दलची चेहऱ्यावर न लपणारी उत्सुकता अशा उत्साहपूर्ण वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षात शाळेची सोमवारी (दि.१७) पहिली घंटा वाजणार असून गेल्या दीड महिन्यांपासून शांत असलेले शाळांची प्रांगणे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी शाळांच्या प्रवेशद्वाराजवळ रांगोळ्या काढण्यात येणार असून शाळेत नव्याने दाखल होणाºया विद्यार्थ्यांचे अनेक ठिकाणी गुलाब पुष्प देऊन, काही ठिकाणी खाऊ देऊन तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. शाळांनी पुस्तकवाटपासह विविध कार्यक्रमांचे नियोजन केले असून काही शाळांनी स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छेतचा संदेश देण्याचे नियोजन केले आहे. काही शाळांमध्ये पताका लावून विद्यार्थ्याचे स्वागताची तयारी केली आहे. विनाअनुदानित आणि खासही शाळांमध्ये नवा गणवेश, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी पालकांबरोबर शाळेमध्ये येताना दिसून येणार असताना शाळेच्या प्रवेशाद्वाराजवळ स्वत: शिक्षक फुले देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करताना दिसणार आहेत. तर दुसरीकडे, पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणाऱ्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांचे रडणे-ओरडणे होऊ नये त्यासाठी काही शिक्षक खाऊ घेऊन उभ असलेले दिसून येतील. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने सर्वच विद्यार्थ्यांचे पालक त्यांना शालेत सोडायला येतील.त्यातच पलिल्यांदाच शाळेत येणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांची पाऊले गेटजवळच घुटमळणार असल्याने शहरातील जवळपास सर्वच शाळांचे परीसर आज गजबजून जाणार आहेत.