विद्यार्थ्यांना मिळणार आॅनलाइन निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 10:57 PM2020-05-05T22:57:02+5:302020-05-05T23:11:06+5:30
नाशिक : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापनाबाबत देण्यात आलेल्या सूचनांनुसार २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचा निकाल विद्यार्थ्यांना दूरध्वनी, एसएमएस व अन्य आॅनलाइन माध्यमांद्वारे तत्काळ कळविण्याच्या सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य यांच्यासह विभागीय उपसंचालक यांना दिल्या आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांच्या सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०१९-२०चा निकाल दूरध्वनी, एसएमएस व अन्य आॅनलाइन पद्धतीने तत्काळ कळवावा अशा सूचना केल्या आहेत.
दरम्यान, विद्यार्थ्यांना निकाल मिळाल्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षाचा अभ्यास करणे उपलब्ध साहित्याच्या आधारे सुरू करणे शक्य होईल, असा विश्वासही त्यांनी या व्यक्त केला आहे.
शिक्षण विभागाच्या सूचना
शिक्षण विभागाने यापूर्वीच विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण ग्राह्य धरून सरासरीच्या आधारे निकाल तयार करण्याच्या सूचना संबंधित शाळा व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांना निकालाविषयी कोणत्याची प्रकारचा संभ्रम राहू नये यासाठी संबंधित संस्थांनी विद्यार्थ्यांचे निकाल त्यांना आॅनलाइन पद्धतीने तत्काळ कळविण्याच्या सूचना दिनकर पाटील यांनी केल्या आहेत.