विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळणार पोस्टातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 10:07 PM2020-10-08T22:07:05+5:302020-10-09T01:11:24+5:30
नाशिक: अकरावी वर्गातील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची काही कारणांनी अडकलेली स्कॉलशिप आता पोस्टाच्या माध्यमातून मिळणार आहे. जिल्'ात ३५ हजार विद्यार्थ्याची नावे पोस्टाकडे प्राप्त झाली असून अशा विद्यार्थ्यांना संपर्क करून त्यांची खाती उघडण्याचे काम सुरू झाले आहे. राज्यात अशाप्रकारचे सुमारे चार लाख खाती उघडली जाणार आहे.

सामाजिक न्याय विभागाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्याच्या बॅँक खात्यात जमा केली जाते. परंतु खाते अधारलिंक करण्याचे राहून गेल्याने किंवा खात्याचा वापर न केल्याने गोठवलेली खाती तसेच अन्य कारणांमुळे राज्यातील सुमारे चार लाख विद्यार्थी अजूनही शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित आहे. कोरोनामुळे महाविद्यालयें बंद असल्याने विद्यार्थी गावी परतले आहेत. त्यांना बॅँक खात्याची पुर्तता करता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
पोस्टाला जिल्हनिहाय प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या नावानुसार विद्यार्थ्यांना लघुसंदेशद्वारे जवळच्या टपाल कार्यालयात खाते उघडण्याचे कळविण्यात आले आहे. खाते उघडल्यानंतर त्याची माहिती आपल्या महाविदयलयांना कळवावी असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे. खाते उघडल्यानंतर विद्यार्थ्यांची रक्कम पोस्टाच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे अशा विद्याथर्यंना आता संबंधित बॅँकेत पोहचण्याचे आणि पुन्हा सर्वप्रक्रिया करण्याची गरज उरलेली नाही. याचा लाभ गावोगावी परसलेल्या विद्यार्थ्यांना अधिक होणार आहे.
विद्याथी पोस्टाशी जोडला जाणार
शिष्यृवृत्तीसाठी जरी हे खाते उघडले जाणार असले तरी ते बचत खात्याप्रमाणेच असणार आहे. विद्यार्थी या खात्यावर आपले नियमित व्यवहार देखील करू शकणार आहे. खाते उघडल्याने विद्यार्थी हा टपाल खात्याशी जोडला जाणार आहे. पहिले खाते म्हणून त्याचे पोस्टाशी ऋणानुबंध जुळणार आहेत.
- राजेंद्र आघाव, वरिष्ठ प्रबंधक, इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक, नाशिक