बस चालकांच्या मुजोरीपुढे विध्यार्थी वैतागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 04:55 PM2018-10-14T16:55:04+5:302018-10-14T16:56:16+5:30
ओझर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असताना बस येऊन थांबत नसल्याने विध्यार्थी वैतागले आहे.यामुळे दोन तीन तास कॉलेज स्टॉपवर उभे राहून विध्यार्थी महामार्गावरील वाहनांच्या वेगाचा सामना करत आहे.
ओझर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असताना बस येऊन थांबत नसल्याने विध्यार्थी वैतागले आहे.यामुळे दोन तीन तास कॉलेज स्टॉपवर उभे राहून विध्यार्थी महामार्गावरील वाहनांच्या वेगाचा सामना करत आहे.
ओझर महाविद्यालयाजवळील थांबा मृत्यूचे केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे आहेत. ओझर येथील महाविद्यालय महामार्गावरील टिळक नगर समोर असून सकाळी कॉलेज सुटण्याची वेळ अकराची असताना सुकेणे बस साडेदहा ला येऊन जात असल्याने त्यानंतर तब्बल दीड वाजेपर्यंत मुलं मुली भर उन्हात याच दरम्यान काही बस चालक मात्र थांबा असताना सरळ निघून जात असल्याने अनेक जण बस पकडण्याच्या नादात खाली पडले आहे. एकीकडे भुयारी कामामुळे सर्व वाहन सर्व्हिस रोड ने जात असून त्याच ठिकाणी जीव मुठीत धरून कमी जागेत हे सर्व विद्यार्थी उभे असतात.दिक्षी,जिव्हाळे,दात्याने,थेरगाव,ओने व कसबे मौजे सुकेणे मोहाडी जानोरी आंबे जानोरी शिवणई आदी ठिकाणाहून तिनशेच्या आसपास मुलं दररोज प्रवास करतात.
याविषयी सीबीएस येथून त्यावेळी सुटणारी बस तेथूनच अर्धा तास उशिराने सुटल्यास त्याचा लाभ सर्वांनाच होणार आहे.त्यामुळे एसटी प्रशासनाने सदर गंभीर बाबींची तातडीने दखल घेण्याची गरज असून त्यामुळे सर्वांचीच वेळेची बचत होऊन अपघातांना आमंत्रण मिळणार नाही.
सदर ठिकाणी अंदारपासचे काम चालुअसल्याने तात्पुरते निवारा शेड उभारण्यात यावे तसेच काही सिटीबस चे वाहक चालक बस रिकामी असताना देखील येथे थांबण्यास आळस करतात त्यामुळे याठिकाणी महामार्गावर अधिकृत थांबा असताना बस पकडायची गरज काय असा सवाल विद्यार्थी विचारत आहे.
काही सिटीबस चालक स्वत:च्या मालकीची गाडी असल्याचे आव आणून विद्यार्त्यांना त्रास देतात.एक बस निघून गेल्यावर तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे.पिंपरी बस दहाव्या मैलापासून वळण घेत असताना पर्यंत देखील वाहक बसण्यास मज्जाव करतात परिणामी कडक उन्हात एकदीड किलोमीटर पायी जावे लागते.
अभिषेक कुलकर्णी
विध्यार्थी, मोहाडी
ओझर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्नाबाबत अनेक तक्र ारी आल्या आहेत.सदर बाब पिंपळगाव आगारप्रमुखांना सांगितली असून आजपासून दोन भरारी पथके याठिकाणी चार तास थांबून कारवाही करणार आहे.
नितीन मैन्ड
विभागप्रमुख नाशिक.