विद्यार्थ्यांनी लिहिले सैनिकांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:14 AM2021-07-28T04:14:59+5:302021-07-28T04:14:59+5:30
कांदा दरात सुधारणा नाशिक : दोन सप्ताहापूर्वी उतरलेले कांद्याचे दर पुन्हा सावरू लागले आहेत. १५०० रुपयांपर्यंत आलेले सरासरी दर ...
कांदा दरात सुधारणा
नाशिक : दोन सप्ताहापूर्वी उतरलेले कांद्याचे दर पुन्हा सावरू लागले आहेत. १५०० रुपयांपर्यंत आलेले सरासरी दर पुन्हा १८३० रुनये प्रती क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कांद्याचे दर वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवलेला आहे. मात्र, दर पडू लागल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले होते. या सप्ताहात पुन्हा कांदा दराने उसळी घेतली असून, अधिकाधिक दर १९०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत गेले आहेत.
महिला विशेष बस सुरू करा
पंचवटी : नाशिक शहरातील महिलांसाठी विशेष बसची मागणी करण्यात आली आहे. शहरातील विविध मार्गांवर महाविद्यालय बसथांब्यावरून बस सेवा सुरू करण्याबाबत व काही बस या मार्गावरून वळविण्याबाबत महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समितीतर्फे नाशिक मनपा सिटी लिंक यांना निवेदन देण्यात आले. महिला प्रवाशांची वाढती संख्या पाहता गर्दीच्या वेळेस महिला स्पेशल अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी मधुरा ट्रस्ट सरचिटणीस व महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या विश्वस्त संपदा हिरे यांनी केली आहे.
वाहून आलेल्या झुडपांमुळे अस्वच्छता
नाशिक : मागील पाच-सहा दिवसांपासून त्र्यंबक परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या पाण्यात वाहून आलेली झाडेझुडपे, गवत, प्लास्टिक सोमेश्वर येथील धबधब्याच्या परिसरात अडकली आहेत. यामुळे या परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या वतीने या परिसरात स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दिशादर्शक फलकाची दुरवस्था
नाशिक : त्र्यंबक रोडवर लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या फलकांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. शहरातून त्र्यंबककडे जाणाऱ्या रस्त्यावर एबीबी सर्कलजवळ महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कमानीवर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. यातील एका फलकाची दुरवस्था झाली आहे. शहरात नव्याने येणाऱ्या वाहनचालकांची यामुळे दिशाभूल होते. रात्रीच्या वेळी अधिक समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. (फोटो २६-१०६)