महाविद्यालयाच्या निष्काळजीपणाने विद्यार्थिनींचे वर्ष गेले वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:20 AM2021-09-16T04:20:23+5:302021-09-16T04:20:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिकरोड : शैक्षणिक शुल्क भरूनही सव्वाशे विद्यार्थिनींचे शुल्क विद्यापीठाला भरलेच नसल्याने परीक्षेच्या यादीत त्यांची नावे न ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : शैक्षणिक शुल्क भरूनही सव्वाशे विद्यार्थिनींचे शुल्क विद्यापीठाला भरलेच नसल्याने परीक्षेच्या यादीत त्यांची नावे न आल्याने या विद्यार्थिनींचे शैक्षणिक शुल्क वाया गेले आहे. संबंधित महाविद्यालयाने विद्यार्थिनींचे परीक्षा शुल्क विद्यापीठाला पाठविलेच नसल्याची बाब तपासणीत पुढे आल्याने महाविद्यालयाच्या या निष्काळजीपणाविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आणि मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोधर ठाकरसी महिला विद्यापीठ संलग्न असलेल्या के. एन. केला महिला महाविद्यालयात सव्वाशे विद्यार्थिनींनी तीन ते साडेचार हजार रुपये शैक्षणिक फी भरुन प्रवेश घेतला आहेे. मात्र, परीक्षेसाठी विद्यार्थिनींचे नावच विद्यापीठात पाठविले नसल्याने त्यांना ऑनलाईन परीक्षेसाठी कोड पाठविण्यात आला नसल्याचे उघड झाल्याने विद्यार्थिनींचे शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे.
नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे के. एन. केला महिला महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये नाशिकरोडसह नाशिक, शिंदे, पळसे यासह अनेक ग्रामीण भागातील मुली व महिलांनी कला, वाणिज्य या शाखेच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्गात प्रवेश घेतला आहे. तसेच काही विद्यार्थिनी एम. ए., एम. कॉम.चेदेखील शिक्षण घेत आहेत.
दरम्यान, मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मोबाईलवर परीक्षेचे वेळापत्रक आले. त्यामध्ये बुधवारपासून २८ सप्टेंबरपर्यंत परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थिनींच्या मोबाईलवर विद्यापीठाकडून हॉल तिकीट संदर्भात पीडीएफ मेसेज आला होता. मात्र, या ११५ विद्यार्थिनींची विद्यापीठाने पाठविलेल्या पीडीएफ एसएमएसमध्ये नावेच नसल्याचे रात्री उघडकीस आल्यानंतर विद्यार्थिनींची धावपळ झाली. त्यांनी लागलीच विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, महाविद्यालयाने नावे पाठविली नसल्याचे त्यांना समजले.
बुधवारी परीक्षेच्या वेळेपर्यंत ऑनलाईन परीक्षेसाठी काेणत्याही प्रकारचा कोड नंबर आला नाही. पेपरची वेळ संपून गेली तरीही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आपले शैक्षणिक वर्ष २०२० - २१ असे असताना महाविद्यालय मात्र एप्रिल २०२२मध्ये परीक्षा द्यावी लागणार असल्याचे सांगून दिशाभूल करत असल्याचे विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांच्या लक्षात आले. या विद्यार्थिनींनी बुधवारी दुपारी प्रभाग सभापती प्रशांत दिवे यांच्यासोबत चर्चा केली. दिवे यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्य अश्विनी दापोरकर आणि आशिष कुटे यांच्याशी मोबाईलवरुन चर्चा केली. तेव्हा दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली.
--दोन चौकटी--