येवला तालुक्यातील विद्यार्थी मोफत बसपासच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 05:34 PM2018-12-09T17:34:50+5:302018-12-09T17:35:35+5:30
मानोरी : नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील भागात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शासनाकडून परिवहन महामंडळाच्या मोफत बस पास सेवेच्या सुविधा उपलब्ध झाल्या असून येवला तालुक्यातील पाच मंडळात दुष्काळ जाहीर होऊन १ महिना उलटून गेला मात्र येवला तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त महाविद्यालयीन विद्यार्थी अद्यापही परिवहन महामंडळाच्या मोफत बस पास च्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
मानोरी : नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील भागात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शासनाकडून परिवहन महामंडळाच्या मोफत बस पास सेवेच्या सुविधा उपलब्ध झाल्या असून येवला तालुक्यातील पाच मंडळात दुष्काळ जाहीर होऊन १ महिना उलटून गेला मात्र येवला तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त महाविद्यालयीन विद्यार्थी अद्यापही परिवहन महामंडळाच्या मोफत बस पास च्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. दोन महिन्यांपूर्वी इंधन दरात झालेल्या दर वाढीमुळे बस तिकिटात झालेल्या दर वाढीमुळे बसपासच्या दरात वाढ झाली होती. सध्या मानोरी बुद्रुक ते येवला हे अंतर २० किलोमीटर असून त्यासाठी बसला २५ रु पये एक बाजूने द्यावे लागतात. त्यामुळे बस नियमाप्रमाणे एक महिन्याला मानोरी बुद्रुक ते येवला साठी ५०० रु पये मोजावे लागत आहे. यात महत्वाची बाब म्हणजे मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, सत्यगाव, देशमाने, मुखेड, शिरसगाव, पिंपळगाव लेप, जऊळके, जळगाव नेऊर, मुखेड फाटा, नेउरगाव आदी भागातील सुमारे १५०० च्या पुढे येवला येथील महाविद्यालयीन शाळेत शिक्षण घेत आहेत. तर काही विद्यार्थी मुखेड फाटा येथून येवला मार्गे कोपरगाव येथे सुद्धा शिक्षण घेत आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती मुळे एव्हडा खर्च करणे आवाक्याबाहेर झाले आहे.
यातील बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी वर्गातील असून सुट्टीच्या दिवशी मिळेल तेथे जाऊन काम करत असतात. आणि या कामाच्या पैशातून शालेय बसपास आणि शैक्षणकि खर्च आम्ही सोडवत असल्याची खंत मानोरी च्या विद्यार्थ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे शासनाने येवला तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत बसपास उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला सध्या कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी रोजगार उपलब्ध करु न शाळेच्या बसपास चा खर्च सोडवत आहे. त्यात सध्या काम कराव की शाळेच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला मोफत बस पास देऊन दिलासा द्यावा.
- ऋ षिकेश भवर,
विद्यार्थी मानोरी बु.
मी दररोज मुखेड फाटा ते येवला आणि येवला ते कोपरगाव असा बस ने प्रवास करून महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.एक महिन्याच्या बस पास चा खर्च १००० इतका असल्याने आत्ताच्या परिस्थितीत एव्हडा खर्च करणे अवघड झाल्याने शासनाने तात्काळ दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोफत बसपास देण्याची गरज आहे.
- ऋतिक दुघड,
विद्यार्थी. मुखेड फाटा.