समाज-संस्कृती संवर्धनासाठी संविधानाचा अभ्यास आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 04:59 PM2019-12-17T16:59:15+5:302019-12-17T16:59:32+5:30
स्वरा पारखी : कळवणला व्याख्यानमालेचा समारोप
कळवण : समाज आणि संस्कृती संवर्धनासाठी भारतीय संविधानाचा अभ्यास आवश्यक असून त्यातून जगण्याचा मार्ग अधिक सुकर होऊ शकेल, असे प्रतिपादन कळवण न्यायालयाच्या न्यायाधिश स्वरा पारखी यांनी व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी बोलताना केले.
कळवण तालुका विधी सेवा प्राधिकरण, कळवण तालुका वकील संघ आणि कळवण एज्युकेशन सोसायटी संचलित, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय संविधान’ या विषयावर पाच दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानमालेच्या पाचव्या दिवशी न्यायाधीश स्वरा पारखी यांनी कलम ३९ अ आणि ५१ अ या विषयावर व्याख्यान दिले. अध्यक्षस्थानी कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार उपस्थित होते. न्यायाधीश स्वरा पारखी यांनी राज्यघटनेतील कलम ५१ अ स्पष्ट करताना कलमाअंतर्गत येणारे मूलभूत कर्तव्ये आपल्या रोजच्या जीवनात अनुभवास येणाऱ्या अनेकविध उदाहरणातून स्पष्ट केले. अध्यक्षीय मनोगतात अॅड.शशिकांत पवार यांनी भारतीय संविधानाची ओळख करून देण्यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून या व्याख्यानमालेचा आजच्या तरु ण पिढीला त्यांच्या जीवनात निश्चित लाभ होईल असे मत व्यक्त केले . या व्याख्यानमालेत सरकारी वकील अॅड. एस. जी. पाटील , अॅड.नानासाहेब पगार ,पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ , न्यायाधिश अमृता जोशी यांची व्याख्याने झाली.
कार्यक्र मास संस्थेचे सरचिटणीस बेबीलाल संचेती , विश्वस्त राजेंद्र भामरे, अॅड.सुभाष शिंदे , अॅड.संजय पवार , महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौ. उषाताई शिंदे , उपप्राचार्य प्रा. डॉ.एन.के.आहेर , प्रा. राजेंद्र कापडे , प्रा. डॉ. बी. एस. पगार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. योगेंद्र ठाकरे यांनी केले तर संयोजन अॅड. संजय बोरसे यांनी केले.