शाळा अनुदानासाठी उपसमितीचे लवकरच गठन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 02:14 PM2020-09-16T14:14:38+5:302020-09-16T14:16:30+5:30

सिन्नर: प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी नेमण्यात येणाऱ्या उपसमितीचे लवकरच गठन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.

Sub-committee on school grants formed soon | शाळा अनुदानासाठी उपसमितीचे लवकरच गठन

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी शाळांना प्रचलित अनुदान देण्याच्या मागणीवर चर्चा करताना शिक्षक संघटनांचे पदाधिकारी.

Next
ठळक मुद्देबाळासाहेब थोरात: माध्यमिक शिक्षक संघ व जिल्हा कृती समिती पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा

सिन्नर: प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी नेमण्यात येणाऱ्या उपसमितीचे लवकरच गठन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.
माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा कृती समिती पदाधिकाऱ्यांनी थोरात यांच्यासह आमदार डॉ सुधीर तांबे यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. त्यावेळी थोरात बोलत होते.
प्रचलित अनुदानाचा प्रश्न सोडवण्यासाठी उपसमिती नेमली आहे. आपण त्या समितीचे अध्यक्ष असलो तरी समितीत कोण कोण असेल हे निश्चित होणे बाकी आहे. तथापि आपण शिक्षकांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन थोरात यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
डॉ तांबे यांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. सर्व समस्या सुटल्या पाहिजे, प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान मिळाले पाहिजे, मुल्यांकन झालेल्या व न झालेल्या शाळांना अनुदान देणे, जूनी पेन्शन योजना सरसकट सर्वांना लागु करणे ह्या व इतर समस्या सोडविण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू असल्याचे ते म्हणाले. माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी शिक्षकांचा समस्या मांडल्या. वीस टक्के अनुदानावर काही शिक्षक निवृत्त होण्याची वेळ आली असल्याची व्यथा मांडली ‌
जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष शरद भामरे, माध्यमिकचे ठाकूर, सचिव गोरख कुलधर, नाशिक विभागीय कार्याध्यक्ष कांतीलाल नेरे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज वाकचौरे, जिल्हा सचिव सोमनाथ जगदाळे, प्रसिद्धी प्रमुख बाबासाहेब खरोटे, सुभाष पवार, शरदचंद्र काकुस्ते, दशरथ जाधव, गोकुळ महाले, एस.डी.पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Sub-committee on school grants formed soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.