सुरगाणा येथे लवकरच उपजिल्हा रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:17 AM2021-08-23T04:17:18+5:302021-08-23T04:17:18+5:30
शहरातून काढण्यात आलेल्या जन आशीर्वाद यात्रेस नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यात्रेनंतर येथील झेंडा चौकात घेण्यात आलेल्या ...
शहरातून काढण्यात आलेल्या जन आशीर्वाद यात्रेस नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यात्रेनंतर येथील झेंडा चौकात घेण्यात आलेल्या सभेस मार्गदर्शन करताना डॉ. पवार म्हणाल्या, मी राजकारणात नसतानापासून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण व माझी चांगली ओळख आहे. आमच्यात दुरावा नाही. यापुढेही असणार नाही. मला त्यांनी चांगले मार्गदर्शन केले आहे आणि करीत आहेत. पश्चिम बंगालमधील एका तरुण युवकाला मंत्रीपद दिले याचा आम्हाला आनंद तर आहेच. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच आठ खासदारांना मंत्रीपद दिले, याचा मोठा आनंद आहे. ज्यांनी तुम्हाला इथपर्यंत पोहोचविले त्या जनतेला भेटायला जा असे मोदींनी सांगून आम्हा सर्वांना जनतेत जायला लावले आहे. आदिवासी भागातील कृषीच्या योजना राबवून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्नशील राहणार असून, सुरगाणा तालुक्यातील विकासासाठी झोकून देणार असल्याचेही यावेळी डॉ. पवार यांनी सांगितले. याप्रसंगी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, कलावतीताई चव्हाण, एन.डी. गावित, भाजप तालुकाध्यक्ष रमेश थोरात, युवा तालुकाध्यक्ष सचिन महाले, जि.प. सदस्य ज्योतीताई जाधव, झंपाताई थोरात, रंजना लहरे, सुनील बच्छाव, विजय कानडे, कैलास सूर्यवंशी, रामजी गवळी, डॉ. विनोद महाले, श्यामू पवार आदी उपस्थित होते.
इन्फो
हरिश्चंद्र चव्हाण यांची उपस्थिती
सभेला माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. चव्हाण म्हणाले, मला अनेकांनी विचारले, तुम्ही या कार्यक्रमात कसे काय? मी सभापती असताना सुरगाणा येथे पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसूंचेदेखील मी स्वागत केले आहे. भारती पवार तर माझ्या कुटुंबातील असून, नातेसंबंधदेखील आहेत. देशातील विविध समाजातील प्रत्येक व्यक्तीला मंत्रीपद दिले गेले. असे देशात प्रथमच घडले असल्याचे माजी खासदार चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तुम्हाला दिलेले हे खाते जबाबदारीचे व आव्हानात्मक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला उपजिल्हा रुग्णालय करावे अशी सूचनाही चव्हाण यांनी पवार यांना केली.
फोटो- २२ सुरगाणा पवार
सुरगाणा येथे जन आशीर्वाद यात्रेनंतर आयोजित सभेत बोलताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार. समवेत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, कलावतीताई चव्हाण, एन.डी. गावित, रमेश थोरात, ज्योतीताई जाधव, रंजना लहरे, झंपाताई थोरात आदी.
220821\22nsk_24_22082021_13.jpg
फोटो- २२ सुरगाणा पवार सुरगाणा येथे जन आशिर्वाद यात्रेनंतर आयोजित सभेत बोलताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार. समवेत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, कलावतीताई चव्हाण, एन.डी.गावित, रमेश थोरात, ज्योतीताई जाधव, रंजना लहरे, झंपाताई थोरात आदी.