त्र्यंबकला उपजिल्हा रुग्णालय; सटाण्याला ट्रामा केअर युनिट

By admin | Published: January 3, 2017 02:01 AM2017-01-03T02:01:16+5:302017-01-03T02:01:29+5:30

त्र्यंबकला उपजिल्हा रुग्णालय; सटाण्याला ट्रामा केअर युनिट

Sub-district hospital of trimmakal; Trama Care Unit to Statna | त्र्यंबकला उपजिल्हा रुग्णालय; सटाण्याला ट्रामा केअर युनिट

त्र्यंबकला उपजिल्हा रुग्णालय; सटाण्याला ट्रामा केअर युनिट

Next

नाशिक : ग्रामीण व आदिवासी भागात आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी राज्यात नव्याने ७४ आरोग्य उपकेंद्र, २० प्राथमिक आरोग्य केंद्र, एक ग्रामीण रुग्णालय, तीन उपजिल्हा रुग्णालय, दोन जिल्हा रुग्णालय, चार स्त्री रुग्णालय व सहा ट्रामा केअर युनिट अशा १११ नवीन आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्यात आल्याची घोषणा आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये केली. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे उपजिल्हा रुग्णालय तर सटाणा येथे ट्रामा केअर युनिट सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सटाणा येथील आरोग्य केंद्रामध्ये ट्रामा केअर युनिटची उभारणी पूर्ण झाली असून, तेथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणे बाकी आहे. आरोग्य मंत्र्यांच्या या घोषणेमुळे त्याचा मार्गही मोकळा झाला आहे. त्र्यंबकेश्वर येथे सध्या ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे. येथे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांची मोठी सोय होणार आहे.

Web Title: Sub-district hospital of trimmakal; Trama Care Unit to Statna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.