पुणेगाव कालव्याच्या अपूर्ण कामासाठी उपविभागाचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 05:52 PM2018-09-30T17:52:51+5:302018-09-30T17:53:15+5:30
चांदवड : पुणेगाव कालव्याच्या अपूर्ण कामांसाठी पुणेगाव कालवा उपविभागाचे कार्यालय धुळे येथून परत नाशिक येथे स्थलांतर झाले आहे. चांदवड जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासनाच्यानिर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील कडवा कालवा विभाग नाशिक हे विभागीय कार्यालय व त्याअंतर्गत असलेल्या चार उपविभागीय कार्यालयांसह दि. १६ जुलै रोजी धुळे येथे सुलवाडे, जामफळ, कनोली उपसिंचन योजनेसाठी स्थंलातरित झाले होते.
चांदवड : पुणेगाव कालव्याच्या अपूर्ण कामांसाठी पुणेगाव कालवा उपविभागाचे कार्यालय धुळे येथून परत नाशिक येथे स्थलांतर झाले आहे. चांदवड जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासनाच्यानिर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील कडवा कालवा विभाग नाशिक हे विभागीय कार्यालय व त्याअंतर्गत असलेल्या चार उपविभागीय कार्यालयांसह दि. १६ जुलै रोजी धुळे येथे सुलवाडे, जामफळ, कनोली उपसिंचन योजनेसाठी स्थंलातरित झाले होते. नाशिक जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत पुणेगाव, ओझरखेड, दरसवाडी आदी योजनांचा समावेश होता. सदर योजनांची कामे प्रशासकीय मान्यतेअभावी मागील पाच वर्षांपासून बंद होती. माहे नोव्हेंबर २०१७ मध्ये या प्रकल्पाच्या तृतीय सुधारित प्रकल्प अहवालास (किंमत रु . ९१७ कोटी) शासनाची मान्यता मिळालेली आहे. सदर शासन मान्यतेनुसार ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाची कामे दोन वर्षांत पूर्ण करावयाची आहेत.
परंतु या प्रकल्पाशी निगडित तांत्रिकदृष्ट्या व भौगोलिकदृष्ट्या माहिती असलेले अनुभवी अधिकारी व कर्मचारी असलेले कार्यालय नाशिक येथून हलविल्यामुळे सदर ३५ वर्षांपासून प्रलंबित व आज रोजी अंतिम टप्प्यात असलेली पुणेगाव, ओझरखेड व दरसवाडी आदी कामांवर परिणाम होऊन चांदवड तालुक्यातील सुमारे पाच हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार होती. तसेच सदर प्रकल्पासाठी दुष्काळग्रस्त भागातील गरीब शेतकऱ्यांकडून सुमारे १२० हेक्टर जमीन ही मागील दहा वर्षांपासून शासनाने ताब्यात घेतली आहे; परंतु जमिनीचा मोबदला मिळण्या संदर्भात कार्यवाही अद्याप अपूर्ण आहे. सदर मोबदला देण्याची कामे नवीन कार्यालयाकडे वर्ग झाल्याने भूसंपादन प्रक्रि येत अडथळे निर्माण झाले होते. यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल दौलतराव अहेर यांनी जुलै २०१८ मध्ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशनापासून सदर कार्यालय धुळे येथे स्थलांतरित करू नये यासाठी अथक प्रयत्न केले. आमदारांनी कार्यालय नाशिक येथे परत आणण्यासाठी मुख्यमंत्री व जलसंपदामंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वारंवार पाठपुरावा केला, त्यास यश मिळाले आहे. दि.२७ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयामुळे पुणेगाव कालव्याच्या विस्तारीकरण व सिंचन निर्मितीच्या कामांसाठी पुणेगा कालवा उपविभाग हे उपविभागीय कार्यालय धुळे येथून परत नांदूरमधमेश्वर प्रकल्प विभाग नाशिक अंतर्गत कार्यान्वित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे चांदवड तालुक्यातील लाभक्षेत्रातील शिवरे, बोराळे, बहादुरी, वडनेरभैरव, पिंपळनारे, खडकजांब, खडकओझर, नारायणगाव, जोपूळ, भाटगाव, परसूल, रेडगाव आदी क्षेत्रातील गावांच्या शेतकºयांना जमिनीचा मोबदला व सिंचनाच्या कामांचा प्रश्न सुटल्यामुळे आनंद व्यक्त करण्ण्यात येत आहे. आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या प्रयत्नांमुळे पुणेगाव कालव्याचे पाणी तीस वर्षांनंतर प्रथमत: ६३ किमी. परसूल गावापर्यंत पाणी आले. दि. ८ सप्टेंबर २०१६ रोजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते परसूल येथे जलपूजन करण्यात आले होते. आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या प्रयत्नांमुळे लाभक्षेत्रात पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या, तसेच जलजागृती सप्ताह यासारखे अभिनव उपक्र म राबविण्यात येत आहेत. आमदार यांच्या प्रयत्नांमुळे पुणेगाव कालव्याच्या कामासाठी चालू वर्षी रु . ३५ कोटी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.