उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला सुरक्षेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 08:58 PM2020-06-03T20:58:20+5:302020-06-04T00:40:48+5:30

देवळा : ‘निसर्ग’ चक्र ीवादळाचा संभाव्य मार्ग हा चांदवड, देवळा तालुक्यातून जात असून, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नदी काठावर असलेल्या नागरिकांनी तसेच तालुक्यातील जनतेने सतर्क राहावे, असे आवाहन चांदवड-देवळा उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी केले.

Sub-divisional officers took stock of the security | उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला सुरक्षेचा आढावा

उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला सुरक्षेचा आढावा

Next

देवळा : ‘निसर्ग’ चक्र ीवादळाचा संभाव्य मार्ग हा चांदवड, देवळा तालुक्यातून जात असून, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नदी काठावर असलेल्या नागरिकांनी तसेच तालुक्यातील जनतेने सतर्क राहावे, असे आवाहन चांदवड-देवळा उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी केले. बुधवारी (दि. ३) ते देवळा तालुक्यातील गिरणा नदीच्या प्रभाव क्षेत्रातील गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा घेण्यासाठी तसेच कोरोना केअर सेंटरच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, मुख्याधिकारी संदीप भोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश कांबळे, आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, नायब तहसीलदार विजय बनसोड, कृषी अधिकारी प्रशांत पवार आदी उपस्थित होते.
नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावे. घर नादुरु स्त असल्यास किंवा पत्र्याचे असेल तर तात्काळ दुरु स्ती करावी व सुरक्षितस्थळी आवश्यक साधनसामग्री सोबत घेऊन स्थलांतरित व्हावे, घराच्या भोवती वादळामुळे विजेचे खांब किंवा तारा, झाडे पडण्याची शक्यता असल्यास अशा त्यापासून लांब राहावे, पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षितस्थळी हलवावे, केरोसीनवर चालणारे दिवे, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तू आपल्यासोबत ठेवाव्यात, हवामान खात्याकडून मिळणारे इशारे व माहितीसाठी जवळ रेडिओ बाळगावा. सोबत आवश्यक पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे, बाल्कनीमधील हँगिंग किंवा लाइट मटेरियल सुरक्षित कराव्यात, वाहने सुरक्षित ठिकाणी ठेवावीत आदी सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. अधिक माहिती व आवश्यक मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे संपर्क करावा, असे आवाहन भंडारे यांनी केले आहे.
-----------------------
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ‘निसर्ग’ चक्र ीवादळ दि. ३ व ४ जून या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील काही भागात येण्याची शक्यता आहे. सदर कालावधीत वाºयाचा वेग जास्त राहील तसेच मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेण्यात आली़

Web Title: Sub-divisional officers took stock of the security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक