उपनिरीक्षक सानप आत्महत्येप्रकरणी शिक्षिककेसह तिच्या पतीवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 04:41 PM2018-11-28T16:41:04+5:302018-11-28T17:02:25+5:30
नाशिक : पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे येथे रेल्वेखाली आत्महत्या करणारे पोलीस उपनिरीक्षक साजन सानप यांच्या पत्नीने बलात्काराचा आरोप करणारी महिला शिक्षिका, तिचा पोलीस उपनिरीक्षक पती व त्याची प्रेयसी अशा तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली आहे़ या प्रकरणी उपनगर पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़

उपनगर पोलीस ठाण्यात शैला साजन सानप (३०, रा. प्रथमेश पार्क, त्रिवेणी चौक, जेलरोड) यांनी दिलेल्या फियार्दीनुसार त्यांचे पती साजन सखाहारी सानप हे मुंबई शहरातील अंबोली पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते़ पती साजन सानप हे गत साडेतीन वर्षांपासून आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर टाकण्याची धमकी देत मद्यप्राशन करून वेळोवेळी बलात्कार केल्याची फिर्याद या परिसरातील महिला शिक्षिका तथा पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीने सोमवारी (दि़२६) उपनगर पोलीस ठाण्यात दिली़ यावर पोलिसांनी बलात्कार तसेच अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याच्या घटनेनंतर पती साजन सानप यांनी मंगळवारी (दि़२७) सकाळी पुणे येथे रेल्वेखाली आत्महत्या केली़
पती साजन सानप यांच्याविरोधात बलात्काराची फिर्याद देणारी ३५ वर्षीय शिक्षिका व तिचा पोलीस उपनिरीक्षक पती यांनी संगनमत करून १ जानेवारी २०१५ ते २७ नोव्हेंबर २०१८ पर्र्यंत वेळोवेळी घरी येत होते़ तर संशयित शिक्षिका ही साजन सानप यांच्याकडे अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी करीत होते, मात्र ती पूर्ण न केल्यानेच शिक्षक महिला व तिचा पती हे ब्लॅकमेल करीत होते़ तसेच बलात्कार व अॅट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात दाखल करण्याची धमकी दिली होती़
पोलीस उपनिरीक्षक व त्याची शिक्षक पत्नी यांनी संगनमताने कट रचून पतीच्या अज्ञात प्रेयसीच्या मोबाईलवर असलेले खोटे-नाटे संभाषण मिळवून पती साजन सानप यांच्यावर खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल केला़ यामुळे पती साजन सानप यांची सामाजिक प्रतिमा खराब करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले़ या गुह्याचा तपास उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते करीत आहेत.