गिरणारे येथे उभारणार उपबाजार
By admin | Published: June 30, 2015 12:20 AM2015-06-30T00:20:43+5:302015-06-30T00:21:09+5:30
गिरणारे येथे उभारणार उपबाजार
नाशिक : शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा मिळण्यासाठी आणि बाजार जवळ येण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे गिरणारे येथे कै. गंगाराम मामा थेटे या नावाने उपबाजार सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आपलं पॅनलचे नेते माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी दिले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आपलं पॅनलचा काल (दि.२९) सकाळी गिरणारे येथे सभासद व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मेळाव्यात बोलताना देवीदास पिंगळे यांनी सांगितले की, कोणताही विकास करण्यासाठी त्याला अर्थकारणाची जोड द्यावी लागते. पर्यायाने विविध बॅँकांकडून कर्ज काढून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मार्केटमध्ये उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे बाजार समितीवर कर्ज झाले, परंतु शरद पवार यांच्या मध्यस्थीने समितीचे १२४ कोटींचे कर्ज सवलत मिळवत ७४ कोटी एकरकमी भरले. त्यामुळे बाजार समितीचा कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला. आजच्या क्षणी बाजार समितीवर कोणतेही कर्ज राहिलेले नाही. बाजार समितीत प्रवेश द्वाराजवळ वाहनतळाचा ठेका अवघा ४० हजार रुपयात देण्यात आला होता, मात्र तो आपण वृत्तपत्रात जाहिरात देऊनही ठेक्याची रक्कम दोन लाख ५० हजारांवर गेली.