बाभुळगावचे उपसरपंच अपात्र

By admin | Published: August 6, 2016 12:36 AM2016-08-06T00:36:07+5:302016-08-06T00:36:15+5:30

बाभुळगावचे उपसरपंच अपात्र

Subdivision of Barabhulgaon ineligible | बाभुळगावचे उपसरपंच अपात्र

बाभुळगावचे उपसरपंच अपात्र

Next

येवला : बाभुळगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच देविदास निकम हे सलग ७ मासिक सभांना गैरहजर राहिल्याने त्यांना अपात्र केले असल्याचा आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे यांनी दिले आहे.
उपसरपंच देविदास निकम यांना प्रत्येक मासिक सभेचा अजेंडा देवूनही ते मासिक सभांना गैरहजर राहिले. मासिक सभेला गैरहजर रहायचे असेल तर रजेचा अर्ज देवून परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र ते सलग सहा महिने गैरहजर राहिल्याने त्यांचे सदस्यत्व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ४० (१) अ व ब नुसार रद्द करण्याबाबतचा अर्ज सदस्य संदिप बावळे व सदस्या सिमा लोंढे यांनी जिल्हा परिषदेकडे केला होता. या प्रकरणाची चौकशी करु न जिल्हा परिषद अध्यक्षा चुंबळे यांनी देविदास निकम यांना अपात्र घोषीत केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Subdivision of Barabhulgaon ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.