सुभाष भामरे : महिला सक्षमीकरणामध्ये अग्रवाल समाजाचे मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 06:02 PM2018-11-18T18:02:19+5:302018-11-18T18:10:47+5:30

अग्र नारी प्रांतीय महिला असोसिएशनच्या १५व्या राज्यस्तरीय ‘अग्र-प्रेरणा’ महिला अधिवेशन रविवारी (दि.१८) शहरातील स्वामी नारायण बॅक्वेट हॉलमध्ये उत्साहात पार पडले.

 Subhash Bhamre: Agarwal community's contribution to women's empowerment has been a major contributor | सुभाष भामरे : महिला सक्षमीकरणामध्ये अग्रवाल समाजाचे मोठे योगदान

सुभाष भामरे : महिला सक्षमीकरणामध्ये अग्रवाल समाजाचे मोठे योगदान

Next
ठळक मुद्दे‘अग्र-प्रेरणा’ महिला अधिवेशन अग्रवाल समाज हा महाराजा श्री अग्रसेन महाराज यांच्या तत्त्वांवर चालणाराअग्रज्योती, अग्रप्रभा पुरस्काराने समाजातील महिला सन्मानित

नाशिक : महिलांचे आर्थिक सामाजिक सबलीकरण व सक्षमीकरण करणे हे सरकारचे मिशन कार्यक्रमांपैकी जरी एक असले तरी उत्तर महाराष्टÑातील नव्हे तर देशभरातील अग्रवाल समाजाचे महिला सक्षमीकरणासाठी मिळणारे योगदान हे नक्कीच प्रेरणादायी आहे. हा समाज शिक्षण, राजकारण, समाजकारण, महिलांचा सर्वांगिण विकास अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून चोख भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.
अग्र नारी प्रांतीय महिला असोसिएशनच्या १५व्या राज्यस्तरीय ‘अग्र-प्रेरणा’ महिला अधिवेशन रविवारी (दि.१८) शहरातील स्वामी नारायण बॅक्वेट हॉलमध्ये उत्साहात पार पडले. या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी भामरे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपिठावर महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, राज्य अग्रवाल संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार चौधरी, प्रांतीय महामंत्री उषा अग्रवाल, प्रांतीय उपाध्यक्ष शारदा अग्रवाल, चेअरपर्सन मीना अग्रवाल, विभागीय अध्यक्ष अलका अग्रवाल, अग्र सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष किरण अग्रवाल, अग्रवाल सभेचे अध्यक्ष नेमिचंद पोद्दार, जिल्हाध्यक्ष सपना अग्रवाल,अध्यक्ष अलका अग्रवाल, वीणा गर्ग आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भामरे म्हणाले, अग्रवाल समाज हा महाराजा श्री अग्रसेन महाराज यांच्या तत्त्वांवर चालणारा समाज आहे. त्यांनी दिलेला मुलमंत्र आर्थिक समानता, आपापसांत सहकार्य अन् संघटनाचे महत्त्व समाजाने गांभीर्याने ओळखले आहे. त्यामुळे हा समाज आज राजकारणात ‘किंगमेकर’ची भूमिका बजावताना दिसतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात या समाजाने दिलेले योगदान प्रशंसनीय आहे. या समाजाने महिलांच्या सक्षमीकरणाची गरज वेळीच ओळखून त्यांना लघुउद्योग, स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविले. महिलांचे संघटन अन सक्षमीकरण कसे करावे, याचे मूर्तिमंत उदाहरण अग्रवाल समाजाने पुढे ठेवल्याचे भामरे यांनी यावेळी अधोरेखित केले.
अग्र नारी असोसिएशनने केलेले महिलांचे संघटन आणि सर्वांगिण विकास कौतुकास्पद असल्याचे भानसी यांनी यावेळी मनोगतातून सांगितले. तसेच हिरे यांनीही अग्रवाल महिला संघटनेच्या कार्याचे कौतुक करत अधिवेशनात मांडण्यात आलेल्या पाच ठराव हे ज्वलंत विषयांना अनुसरून असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते अग्रज्योती, अग्रप्रभा पुरस्काराने समाजातील महिलांना सन्मानित करण्यात आले. तसेच अग्र प्रेरणा-२०१८’ या माहितीपुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक महामंत्री उषा अग्रवाल यांनी केले. सूत्रसंचालन रुपा अग्रवाल, दीपक अग्रवाल यांनी केले.

यांचा झाला सन्मान
अग्रज्योती पुरस्कारार्थी : अलका अग्रवाल (शैक्षणिक), वीणा गर्ग (औद्योगिक), निर्मला अग्रवाल (सांस्कृतिक), अनिता अग्रवाल (सामाजिक), ममता गिंदोडीया (अध्यात्म)
अग्रप्रभा पुरस्कारार्थी : कल्पना चौधरी (महिला संघटन), मंजु तुलस्यान (सामाजिक), शीला अग्रवाल (महिला उत्थान), शोभा पालडीवाल (धार्मिक)
विशेष पुरस्कार : सपना अग्रवाल, अरुणा अग्रवाल, डॉ. ममता अग्रवाल.

असे झाले ठराव
गरजूंसाठी अवयवदान करत आपल्या मृत्यूनंतर आपण एखाद्याला जीवदान देऊ शकतो. तसेच मरावे परि अवयवरुपी उरावे या उक्तीनुसार आपण अवयवदात्यांची संख्या वाढविण्यामध्ये हातभार लावूया असे डॉ. ममता अग्रवाल यांनी अवयवदानाचा ठराव सुचविला. तसेच पर्यावरणाचे संतुलन टिकविणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य असल्याने पर्यावरण संरक्षणाचा ठराव नीरा अग्रवाल यांनी मांडला तर प्रि वेडिंग फोटो शूटवर बंदी गरजेची हा ठराव संगीता चौधरी यांनी पुढे आणला. याबरोबरच गोपनीय व्यवहारामध्ये स्त्री-पुरूष दोघांमध्ये समन्वय गरजेचा असल्याचा ठराव मीना अग्रवाल व मुलीच्या वैवाहिक आयुष्यात आईची भूमिका व संस्काराचे महत्त्वाचा ठराव ममता गिंदोडिया यांनी मांडला. अधिवेशनात मांडण्यात आलेले हे ठराव सर्वांनुमते पारित करण्यात आले.

Web Title:  Subhash Bhamre: Agarwal community's contribution to women's empowerment has been a major contributor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.