किट खरेदीचा विषय पुन्हा स्थायीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:41 AM2020-12-11T04:41:38+5:302020-12-11T04:41:38+5:30
कोरोनाकाळात आपत्कालीन गरज म्हणून महापालिकेने सुमारे अडीच कोटी रुपयांचे किट खरेदी करून त्याच्या कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडला ...
कोरोनाकाळात आपत्कालीन गरज म्हणून महापालिकेने सुमारे अडीच कोटी रुपयांचे किट खरेदी करून त्याच्या कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडला होता. त्याचबरोबर काही औषधांचा प्रस्तावदेखील सादर करण्यात आला होता, मात्र कार्योत्तर मंजुरीसाठी प्रस्ताव असल्याने स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी तो मंजूर करून दप्तरी दाखल केला. हा प्रस्ताव लेखापरीक्षणासाठी सादर झाल्यानंतर त्याला आक्षेप घेण्यात आला. दप्तरी दाखल म्हणजे मंजुरी आहे किंवा नाही याचा स्पष्ट उलगडा होत नसल्याने हा प्रस्ताव पुन्हा समितीसमोर मांडण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.११) त्यास औपचारिक मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
इन्फो..
महापालिकेच्या आगामी आर्थिक वर्षासाठी म्हणजेच २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रकाचा कार्यक्रमदेखील या स्थायी समितीत संमत करण्यात येणार आहे. २० फेब्रुवारीच्या आत आयुक्त समितीला अंदाजपत्रक सादर करतील, तर ३१ मार्चपर्यंत स्थायी समितीने त्याला मंजुरी देणे अपेक्षित आहे.