भुयारी मार्गामध्ये साचले डबके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:31 AM2019-07-23T00:31:17+5:302019-07-23T00:31:37+5:30
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कमोदनगर आणि स्टेट बँक चौक याठिकाणी, कोट्यवधी रुपये खर्च करून भुयारीमार्ग तयार केला, परंतु या भुयारी मार्गात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून येत आहे.
इंदिरानगर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कमोदनगर आणि स्टेट बँक चौक याठिकाणी, कोट्यवधी रुपये खर्च करून भुयारीमार्ग तयार केला, परंतु या भुयारी मार्गात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून येत आहे. अल्को मार्केट ते स्टेट बँक चौक भुयारी मार्गामध्ये पावसाच्या पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे भुयारीमार्ग शोभिवंत वस्तू बनून राहिली आहे.
या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, याकरिता संबंधित अधिकऱ्यांकडून या कामाची दखल घेऊन ताबडतोब योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी होत आहे.
मुंबई-आग्रा महामार्गापासून आजूबाजूस राहणारे स्थानिक लोक तसेच काही कामानिमित्ताने महामार्गावरून रस्त्याच्या एका बाजूने दुसºया बाजूस ये-जा करणारे पादचारी यामुळे वाहतुकीस अडथळा येत होता तसेच या भागात मोठे अपघात होऊन काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. यावर उपाय म्हणून अपघात टाळण्याकरिता तसेच पादचाऱ्यांना सहज रस्ता ओलांडता यावा याकरता कमोदनगर आणि स्टेट बँक चौक याठिकाणी भुयारी मार्ग तयार केले, परंतु या भुयारी मार्गात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून येत आहे. नियोजनाच्या अभावामुळे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. याकरिता संबंधित अधिकाºयांकडून या कामाची दखल घेऊन ताबडतोब योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. त्यामुळे भुयारी मार्गाचा नागरिकांना वापर करता येत नाही त्यामुळे नागरिक उड्डाणपुलावरूनच मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तातडीने भुयारी मार्गातील पावसाचे पाणी काढून त्या ठिकाणी पुन्हा पावसाचे पाणी साचणार नाही याची उपाययोजना करण्याची मागणी नीलेश साळुंखे, महेश चव्हाण, विशाल मराठे, अजय पाटील, प्रवीण पवार, कुणाल पाटील, संदीप साळुंखे, राहुल काळे यांनी केला आहे.
उड्डाणपुलावरून पादचाºयांचे मार्गक्रमण
अल्को मार्ग परिसरातील आणि सिडको परिसरातील नागरिकांची उड्डाणपूल झाल्यापासून गैरसोय झाली होती. त्यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून उड्डाणपुलावरून मार्गक्र मण करीत होते. त्यामुळे लहान-मोठ्या अपघाताची संख्या वाढली होती. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन अल्को मार्केट ते स्टेट बँक चौक असा भुयारी मार्ग तयार करण्यात आला. परंतु पहिल्याच पावसात भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहेत. तसेच या पाण्यात शेवाळ मोठ्या प्रमाणात साचले आहे.
भुयारी मार्गात टवाळखोरांचा वावर
अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणावर राहील, असे नागरिकांचे म्हणणे आहे. भुयारी मार्गाबाबत करण्यात आलेले नियोजन हे एकप्रकारे चुकीचे दिसून येत आहे. त्यामुळे हा भुयारी मार्ग पादचाºयांसाठी निरु पयोगी ठरत आहे. या भुयारी मार्गात सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या दिसून येत नाही. त्यामुळे हा भुयारी मार्ग टवाळखोरांचा अड्डा होऊ पाहत आहे. या ठिकाणी आपल्याला जागोजागी मद्याच्या बाटल्या पडलेल्या दिसून येतात. या ठिकाणी सुरक्षिततेच्या बाबतीत काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, पादचाºयांना कितपत उपयोग होणार आहे, याबाबत कधी दाखल घेतली गेलेली दिसून येत नाही.