अपर जिल्हाधिकाऱ्यांना महिला मंडळाचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:17 PM2020-02-12T22:17:21+5:302020-02-12T23:54:35+5:30

हिंगणघाट जळीत कांडातील आरोपी विकेश नगराळे यास फाशीची शिक्षा द्यावी अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय महिला मंडळातर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Submission of Women Board to the Additional Collector | अपर जिल्हाधिकाऱ्यांना महिला मंडळाचे निवेदन

हिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागणीचे निवेदन अ.भा. महिला मंडळातर्फे अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना देताना अलका भावसार, पूनम सावळे, डॉ. अमेया बेंडाळे, राजश्री बेंडाळे, अंजली माळवी, कोजागिरी लोहारकर, शिवानी लिंगायत आदी.

googlenewsNext

मालेगाव : हिंगणघाट जळीत कांडातील आरोपी विकेश नगराळे यास फाशीची शिक्षा द्यावी अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय महिला मंडळातर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
राज्याला हादरून सोडणाºया हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देणारा आरोपी विकेश नगराळे यास फाशीची शिक्षा द्यावी याशिवाय आंध्रातील कुर्नुल येथील बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपींना कठोर शासन करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर भारतीय महिला मंडळाच्या अलका भावसार, डॉ. अमेया बेंडाळे, राजश्री बेंडाळे, माजी नगरसेवक पूनम सावळे, अंजली माळवी, कोजागिरी लोहारकर, शिवानी लिंगायत आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Submission of Women Board to the Additional Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.