‘कृउबा’च्या संचालकांवर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:54 AM2018-06-20T01:54:54+5:302018-06-20T01:54:54+5:30
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार संचालकांवर आदर्श आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी (दि.१९) दिले. संचालकांनी शासकीय वाहनांचा वापर केल्याप्रकरणी त्यांना दोषी धरण्यात आले आहे.
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार संचालकांवर आदर्श आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी (दि.१९) दिले. संचालकांनी शासकीय वाहनांचा वापर
केल्याप्रकरणी त्यांना दोषी धरण्यात आले आहे.
नाशिक विभागासाठी विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. यामुळे राज्याच्या निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. या कालावधीत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींसह संचालकांकडून शासकीय वाहनांचा वापर करण्यात आल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दोषी उपसभापतींसह संचालकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. या वाहनाचे चालक एम. बी. ढिकले यांस नोटीस देत त्वरित खुलासा करण्याचे आदेश बाजार समिती सभापतींने दिले होते. त्यानुसार खुलासा मिळताच वाहनचालकाने सचिवांसह संचालकांना वाहनातून नेले होते, असा क बुली जबाब दिल्याचे सांगितले. त्यांनतर जिल्हा प्रशासनाने वाहनचालक ढिकले याचा पुन्हा जबाब नोंदवून घेत काळे यांच्यासह चार संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार राज्यश्री आहिरराव यांना दिले आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
सभापतींकडे मागितला खुलासा
पिंपळगाव बाजार समिती येथे मंगळवारी (दि.५) अभ्यासदौºयासाठी कृउबाच्या सचिवांसह संचालकांनी शासकीय वाहनांचा वापर केल्याचे समोर आले आहे. बाजार समितीचे शासकीय वाहनामधून (क्र. एमएच १५ ईएक्स ३७९५) संबंधित समितीचे उपसभापती संजय तुंगार यांनी सचिव अरुण काळे, संचालक दिलीप शंकर थेटे, रवींद्र तुकाराम भोये, युवराज बाबूराव कोठुळे यांनी अभ्यासदौºयासाठी हजेरी लावली. प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन सभापतींकडे खुलासा मागितला होता.