कांदा अनुदानासाठी पुन्हा कागदाची जमवाजमाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 05:52 PM2019-02-20T17:52:08+5:302019-02-20T17:52:25+5:30
खामखेडा : राज्य शासनाने कांदा अनुदानासाठी जानेवारी महिन्यात बाजार समितीत विक्र ी केलेल्या कांद्याला अनुदान जाहीर केल्याने शेतकरी पुन्हा कागदाची जमवाजमाव करतांना दिसून येत आहे.
खामखेडा : राज्य शासनाने कांदा अनुदानासाठी जानेवारी महिन्यात बाजार समितीत विक्र ी केलेल्या कांद्याला अनुदान जाहीर केल्याने शेतकरी पुन्हा कागदाची जमवाजमाव करतांना दिसून येत आहे.
राज्य शासनाने आता पर्यत एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीत बाजार समितीत विक्र ी केलेल्या कांद्याला दोनशे रु पये प्रती क्विंटल अनुदान जाहीर केले होते. परंतु या नोव्हेंबर महिन्यात दिवाळी निमित्त मार्केटला बऱ्याच दिवस सुट्या होत्या. तसेच दिवाळी झाल्यानंतर कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरणा झाल्याने पुढे काही दिवसाने कांद्याच्या भावात वाढ होईल या आशेने शेतकºयांनीे कांद्याची विक्र ी केली नाही.
परंतु दिवाळी नंतर बाजारात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने उन्हाळी कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. परंतु जे काही मिळेल यासाठी शेतकरी ज्या बाजार समितीमघ्ये कांदा विक्री केला होता. परंतु चालू वर्षी लाल कांद्याचे मोठया प्रमाणात उत्पादन झाल्याने व उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिल्याने मार्केटमघ्ये आवक वाढली, पर्यायाने कांदा कवडीमोल भावाने विकला जात होता.
विक्र ी केलेल्या कांद्याच्या पैशातून मजुरी आणि वाहन भाडे सुद्धा मिळत नव्हते. परंतु पुन्हा जर शासनाने विक्र ी केलेल्या कांद्याला अनुदान जाहीर केले तर निदान अनुदानाचे पैसे तर हाती मिळतील या आशेवर शेतकरी घरातून पैसे देऊन कांद्याची विक्री करीत होता. आता पर्यत दोन वेळेस शेतकºयाने कांदा विक्र ीची पावती, जमिनीचा सातबारा उतारा त्यावर कांदा पिक लागवड केल्याची नोंद, आधार कार्डची झेरॉक्स, बॅँक पासबुक झेरॉक्स हि सर्व कागद पत्रे जेथे कांदा विक्र ी केली आहे. त्या बाजार समितीत त्या बाजार समितीचा फॉर्म भरून जमा केले. परंतु यासाठी मोठी धावपळ करावी लागली आणि पुन्हा शासनाने कांद्याच्या अनुदानासाठी जानेवारी महिन्यात विक्र ी केलेल्या कांद्यासाठी मुदत वाढ दिली.
परंतु पुन्हा राज्य शासनाने एक जानेवारी ते एकतीस जानेवारी महिन्यात विक्र ी केलेल्या कांद्याला अनुदान देण्याचे जाहीर केलेल्याने पुन्हा शेतकरी या कागदाची जमावाजमाव करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आता सातबारा उतारा काढण्यासाठी सकाळपासून तलाठी कार्यालयात गर्दी वाढली आहे.