बॅँक शाखाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा: सुभाष भामरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:21 AM2018-08-25T00:21:12+5:302018-08-25T00:22:40+5:30
बिकट आर्थिक परिस्थितीला कंटाळून मृत्यूला कवटाळलेल्या उत्राणेच्या दिव्यांगाला मरणोपरांतही न्याय मिळत नसल्याने छावा क्र ांतिवीर सेना आणि संभाजी ब्रिगेडने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. यावेळी भामरे यांनी पगार कुटुंबीयाला दोन लाखांच्या मदतीची घोषणा केली, तसेच चौकशी करून संबंधित बॅँक शाखाधिकाºयाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या.
सटाणा : बिकट आर्थिक परिस्थितीला कंटाळून मृत्यूला कवटाळलेल्या उत्राणेच्या दिव्यांगाला मरणोपरांतही न्याय मिळत नसल्याने छावा क्र ांतिवीर सेना आणि संभाजी ब्रिगेडने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. यावेळी भामरे यांनी पगार कुटुंबीयाला दोन लाखांच्या मदतीची घोषणा केली, तसेच चौकशी करून संबंधित बॅँक शाखाधिकाºयाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या.
२० आॅगस्ट रोजी उत्राणे येथील प्रवीण कडू पगार या ३५ वर्षाच्या दिव्यांग मराठा तरुणाने सेंट्रल बँक आॅफ इंडिया (शाखा म्हसदी, जिल्हा धुळे)च्या शाखाधिकाºयाने सतत ७ महिने केलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती़
सबळ पुरावा उपलब्ध असूनही प्रशासनाने बँक शाखाधिकाºयाविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही. प्रवीणच्या कुंटुंबीयांना आर्थिक मदतही दिली गेली नसल्याची कैफियत यावेळी भामरे यांच्यापुढे मांडण्यात आली. यावेळी भामरे यांनी दोन लाखांच्या मदतीची घोषणा केली. तसेच चौकशी करून शाखाधिकाºयाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी करण गायकर यांच्या समवेत प्रा. उमेश शिंदे, शिवाजी मोरे, संतोष माळोदे,भूषण आहेर, सागर शेजवळ, सतीश नवले, भारत आहेर, योगेश सोनवणे, विकास काळे या छावा
क्र ांतिवीर सेनेच्या कार्यकर्त्यांसह संभाजी ब्रिगेडचे सचिन अहिरराव, चारुदत्त खैरनार, निकिता सावंत, परेश भामरे, मयूर पगार, अक्षय पगार, विशाल धोंडगे, ऋषिकेश शिरसाठ, मोहन पगार, सुनील पगार, सतीश कापडणीस, विजय अहिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पात्रता असूनही कर्ज मिळत नाही, लोकप्रतिनिधींना सांगूनही न्याय मिळत नाही म्हणून नैराश्याने ग्रासलेल्या प्रवीणने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. आत्महत्येपूर्वी प्रवीणने आपली कैफियत सांगणारी चिठ्ठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून ठेवली होती. इतकेच नव्हेतर बँक शाखाधिकाºयाने प्रवीण आणि त्याच्या वृद्ध आईचा छळ केल्याची चित्र- ध्वनीफीतही उपलब्ध आहे.