उपनगर पोलिसांनी वसूल केला ७५ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:16 AM2021-05-21T04:16:37+5:302021-05-21T04:16:37+5:30
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आठ पथके उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत आहेत. ...
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आठ पथके उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत आहेत.
दोन दिवसात झालेल्या कारवाईत विना मास्कप्रकरणी पाच गुन्ह्यात २,५०० रुपये दंड, सार्वजनिक वाहतूक संचार बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ९६ प्रकरणात ५० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या एका दुकानदाराकडून १००० रुपये दंड, संचारबंदी उल्लंघनच्या १० प्रकरणात ५००० रुपये दंड, ई-पासच्या एका प्रकरणात एक हजार रुपये तर, आस्थापनाच्या २ प्रकरणात १५ हजार असा ११६ प्रकरणांमध्ये ७५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
जिल्हा प्रशासनाने १२ ते २३ मे या दरम्यान शहरासह जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अशाही परिस्थितीत काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात. त्यामुळे अशा टवाळखोरांना पोलिसांनी चांगला चोप दिला. देवळालीगाव, जेलरोड, विहितगाव, सुभाषरोड, रेल्वेस्टेशन, बसस्थानक, देवी चौक, बिटको चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, मुक्तीधाम आदी भागातील सर्वच व्यवहार बंद होते. त्यामुळे रस्त्यावर सन्नाटा पसरला होता. काही रिक्षाचालक संधीचा फायदा घेऊन प्रवाशांकडून जास्त दराने भाडे आकारणी करत होते. काही पानटपरी चालक लपून छपून पान, तंबाखू, सिगारेट जास्त दराने विकत होते.