उपनगरच्या लाचखोर पोलिसाला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 05:58 PM2020-12-10T17:58:35+5:302020-12-10T18:01:43+5:30

आकाशने पोलिस चौकीत सोनवणे यांना लाचेची रक्कम दहा हजार रुपयें देण्यासाठी आला असता रचलेल्या सापळ्यात त्याच्याकडून रक्कम स्विकारताना सोनवणे रंगेहात अडकले.

Suburban police were handcuffed | उपनगरच्या लाचखोर पोलिसाला ठोकल्या बेड्या

उपनगरच्या लाचखोर पोलिसाला ठोकल्या बेड्या

Next
ठळक मुद्देदहा हजार स्विकारताना पोलीस चौकीत घेतले ताब्यातजामिन देण्याचे आमीष

नाशिक : एका विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपींना जामिन देण्यासाठी व मदत करण्यासाठी दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना उपनगरचे संशयित पोलिस हवालदार बाळासाहेब सोनवणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस चौकीत रंगेहात ताब्यात घेतले.

जेलरोड, नारायणबापूचौक येथील पोलिस चौकीत कार्यरत असलेले सोनवणे यांनी गेल्या आठवड्यात पळसे येथील तक्रारदाराच्या वडिलांना पोलिस चौकीत बोलावून गुन्ह्यात जामीन देण्यासाठी व मदत करण्यासाठी दहा हजाराची मागणी केली होती. 'पैसे दिले नाही तर तुम्हाला या गुन्ह्यात त्रास होईल', असे सोनवणे यांनी त्यांना सांगितले होते. यावेळी राजेंद्र मोरे यांनी पैशाची व्यवस्था करतो, असे त्यांना सांगितले.

८ डिसेंबरला मुलगा आकाशला पैसे घेऊन पाठवा, असे सोनवणे यांनी सांगितले होते. दरम्यान, ७ डिसेंबरला मोरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाऊन तक्रार केली. या विभागाच्या पथकाचे कर्मचारी खातरजमा करण्यासाठी मंगळवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास नारायण बापू चौकातील पोलिस चौकीत तक्रारदारासोबत गेले असता सोनवणे यांनी पैशांची मागणी केली. पथकाला दहा हजाराची लाचेची खातरजमा झाल्यानंतर बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आकाशने पोलिस चौकीत सोनवणे यांना लाचेची रक्कम दहा हजार रुपयें देण्यासाठी आला असता रचलेल्या सापळ्यात त्याच्याकडून रक्कम स्विकारताना सोनवणे रंगेहात अडकले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Suburban police were handcuffed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.