शहरालगत पर्यटनाला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:12 AM2021-06-21T04:12:02+5:302021-06-21T04:12:02+5:30

मागील तीन ते चार महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागरिकांना जेरीस आणले होते. कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्याने आता निर्बंधही ...

Suburban tourism booms | शहरालगत पर्यटनाला उधाण

शहरालगत पर्यटनाला उधाण

googlenewsNext

मागील तीन ते चार महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागरिकांना जेरीस आणले होते. कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्याने आता निर्बंधही हळूहळू शिथिल होत आहे. शहरातील पोलिसांची नाकाबंदीही हटली आहे. यामुळे पुन्हा जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. मॉल्सदेखील खुले करण्यास प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. दरम्यान, शुक्रवारपासून शहर व परिसरात पावसाच्या सरींचा वर्षाव सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बारा दिवसांपासून उघडीप दिलेल्या वरुणराजाने वीकेंडला पुन्हा एकदा पुनरागमन केल्यामुळे वर्षासहलींचा बेत अनेकांनी शनिवारपासून आखला. काहींनी शनिवारीच दोन दिवसांच्या पर्यटनासाठी जिल्ह्याची सीमा ओलांडली तर बहुतांश नाशिककरांनी एकदिवसीय वर्षासहलीतून मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी शहराजवळील दूधस्थळी धबधबा, गंगापूर धरणाचे बॅकवॉटर, खंडोबा टेकडीचा परिसर, पांडवलेणी, चामरलेणी, गोदा पार्क, मखमलाबाद या भागाला पसंती दिली. यावेळी तरुणाईच्या उत्साहाला मोठे उधाण आल्याचे पहावयास मिळाले.

--इन्फो--

‘दूधस्थळी’ धबधब्याचा परिसर फुलला

नाशिककरांच्या नेहमीच पसंतीचा राहिलेल्या दूधस्थळी धबधबा परिसर पर्यटकांनी फुलून गेला होता. गंगापूर, गोवर्धन ते आनंदवलीपर्यंत दुपारी चार वाजेपासून संध्याकाळपर्यंत पाऊस जोरात सुरू होता. यामुळे संध्याकाळी येथे आलेल्या पर्यटकांचा उत्साह अधिकच वाढल्याचे दिसून आले. वातावरणातील गारवा अन‌् कोळशांवर भाजलेले मक्याचे कणीस व फक्कड चहाचा आस्वाद घेत पर्यटकांनी फोटोसेशन करत मनमुराद आनंद लुटला. यावेळी आजूबाजूच्या लहान विक्रेत्यांच्याही रोजगाराला चालना मिळाली.

--इन्फो--

अंजनेरी, ब्रह्मगिरीवर ‘नो एंट्री’

बहुतांश पर्यटकांनी शहराची सीमा ओलांडून अंजनेरी, ब्रह्मगिरी पर्वताचा परिसर गाठला, मात्र पर्वतावर जाण्यास वनविभागाने मज्जाव केल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. पर्यटकांना अंजनेरी, ब्रह्मगिरी वनक्षेत्रात प्रवेश बंद करण्यात आला आहे. यामुळे अनेकांनी केवळ अंजनेरी गावातून वळसा घालत जुन्या हेमाडपंती मंदिरांच्या साक्षीने निसर्गरम्य वातावरणात फोटोसेशन करत समाधान मानले. त्याचप्रमाणे पेगलवाडी फाट्यावरून पहिनेबारीकडे जाणारी वाटदेखील पर्यटकांसाठी पोलिसांकडून बंद करण्यात आली होती.

===Photopath===

200621\20nsk_31_20062021_13.jpg~200621\20nsk_33_20062021_13.jpg~200621\20nsk_34_20062021_13.jpg

===Caption===

वर्षा सहलीसाठी उडालेली झुंबड~दुधस्थळी धबधबा~दुधस्थळी धबधबा

Web Title: Suburban tourism booms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.