भुयारीमार्ग बनला मद्यपींचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 09:45 PM2020-08-17T21:45:09+5:302020-08-18T01:08:58+5:30
सिडको : लेखानगर ते पाथर्डी फाटा यादरम्यान असलेल्या उड्डाणपुलाखाली तयार करण्यात आलला भुयारी मार्ग नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात आला असला तरी नागरिकांना विशेष करून महिलावर्गास या ठिकाणाहून ये-जा करणे कठीण होत आहे. या भुयारीमार्गाचा ताबा गर्दुल्ले तसेच मद्यपींनी घेतला असल्याने भुयारीमार्ग हा सोयीपेक्षा गैरसोयींचाच झाल्याने नागरिकांकडून बोलले जात आहे.

नागरिकांना रहिवासी भागातून महामार्गाच्या सहाय्याने रस्ता ओलांडताना अनेकदा अपघात होण्याचे प्रकार घडले असल्याने शासनाच्या वतीने रहिवासी भागातील नागरिकांसाठी ये-जा करण्यासाठी लेखानगर ते पाथर्डीफाटा यादरम्यान असलेल्या महामार्गाच्या खाली भुयारीमार्ग तयार करण्यात आले आहे. परंतु या भुयारीमार्गाचा वापर नागरिकांऐवजी मद्यपी करीत असल्याने चित्र बघावयास मिळत आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला असून, नाशवंत व खराब झालेले अन्नदेखील याठिकाणी टाकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. रात्रीच्या वेळी या जागेचा वापर मद्यपींकडून केला जात असून, काही टवाळखोरांकडून नागरिकांना मारहाण करून लूटमारदेखील करण्याचे प्रकार अनेकदा घडले आहे. या भुयारीमार्गाचा वापर योग्यरीतीने होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. शासनाच्या वतीने शहरातील रहदारीचा ताण कमी होण्यासाठी उड्डाणपूल तयार केला असून, लेखानगर ते पाथर्डीफाटा यादरम्यान या उड्डाणपुलाखालील भुयारीमार्गाचा मद्यपींकडून सर्रास वापर केला जात आहे. पाथर्डीफाटा येथील उड्डाणपुलाखाली कचरा तसेच घाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी मद्य पिणे व इतर अवैध प्रकारदेखील सुरू असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वासननगर परिसरातील नागरिकांना रस्ता ओलांडून पुलाखालून जाताना याचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी.
-धनाजी लगड, प्रभाग समिती सदस्य