द्वारका भुयारी मार्ग गजबजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 11:32 PM2020-01-30T23:32:08+5:302020-01-31T00:45:35+5:30
द्वारकावर होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे गुरफटून जाणारे पादचारी अन् अपघातांना मिळणारे निमंत्रण रोखण्यासाठी द्वारका भुयारी मार्ग पूर्णपणे वापरात आणण्यासाठी शहर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी चर्चा केली आहे. लवकरच भुयारी मार्ग गजबजणार असल्याचा विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
नाशिक : द्वारकावर होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे गुरफटून जाणारे पादचारी अन् अपघातांना मिळणारे निमंत्रण रोखण्यासाठी द्वारका भुयारी मार्ग पूर्णपणे वापरात आणण्यासाठी शहर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी चर्चा केली आहे. लवकरच भुयारी मार्ग गजबजणार असल्याचा विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पादचाऱ्यांना द्वारका सहज अन् सुरक्षित ओलांडता यावी यासाठी लाखो रुपये खर्च करून भुयारी मार्ग तयार करण्यात आला, मात्र या भुयारी मार्गाच्या तांत्रिक बाजूच्या त्रुटींमुळे पादचाºयांनी तो नाकारला आणि नशेबाजांनी कालांतराने त्याचा ताबा घेतला. त्यामुळे पादचारी द्वारक ा पुन्हा जीव मुठीत धरूनच ओलांडू लागले.
द्वारकेवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना पोलीस आयुक्तालय, शहर वाहतूक शाखेकडून केल्या जात आहेत. यासाठी महामार्ग प्राधिकरण, महापालिका प्रशासनालाही विश्वासात घेतले जात आहे.
भुयारी मार्गाची दुरवस्था प्रचंड प्रमाणात झालेली आढळून आली. तसेच त्यामध्ये अस्वच्छतेचे प्रमाण खूप असल्यामुळे पादचारी नागरिकांकडून भुयारी मार्गाचा वापर हळूहळू थांबविला गेला.
मात्र आता पुन्हा भुयारी मार्ग वापरात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहे, यासाठी प्राधिकरणाला विविध सूचना देण्यात आल्याचे नांगरे पाटील म्हणाले. भुयारी मार्गाचा पादचाºयांनी सुरक्षेच्या कारणास्तव वापर करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.
...असा होणार बदल अन् पालटणार रूपडे
सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार, पायºयांची योग्यप्रकारे दुरुस्ती, पिवळे अंधुक दिवे काढून पांढरे लख्ख प्रकाश देणारे दिवे बसविणार, ठळक अक्षरात सुटसुटीत दिशादर्शक फलक लावणार, पंधरा दिवसांत महामार्ग प्राधिकरणाकडून विक्रेत्यांना व्यवसायास परवानगी, प्रत्येक जिन्यासमोरील अतिक्रमण मनपाच्या मदतीने हटविणार, निर्भया पोलीस व भद्रकाली पोलीस ठाणे बिट मार्शलची नियमित गस्त राहणार, अमली पदार्थांची नशा करणाºयांवर कारवाईचे आदेश.
रिक्षा, बसेसला द्वारकेवर थांबण्यास पोलिसांचा मज्जाव
सध्या द्वारकेच्या चौहोबाजूला रिक्षा थांबे आहेत. यामुळे पुणे महामार्ग, सारडा सर्कल रस्ता, वडाळा नाका समांतर रस्ता, झाकीर हुसेन समांतर रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे द्वारकेवरील सर्व रिक्षा थांबे स्थलांतरित केले जाणार असल्याचे उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
४द्वारका परिसरात कुठेही रिक्षा, खासगी लक्झरी बसेस तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस थांबणार नाहीत, द्वारका थांबा तत्काळ रद्द केला जावा, यासाठी महामंडळाच्या नाशिक विभागाच्या वाहतूक निरीक्षकांसोबतही पत्रव्यवहार केला जाणार आहे, असे चौगुले यांनी सांगितले.