अभ्यासाला जिद्दीची जोड दिल्यास यश : बच्छाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:29 AM2018-06-18T00:29:05+5:302018-06-18T00:29:05+5:30
गुणगौरव कार्यक्रम होणे महत्त्वाचे असून त्या माध्यमातून प्रेरणा मिळण्यासोबतच सामाजिक बांधिलकी निर्माण होते. पालकांनी विद्यार्थ्यांना करिअरची निवड करताना त्यांचा कल लक्षात घ्यावा, अभ्यास व जिद्द यांची जोड दिल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन जि. प. शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी केले.
नाशिक : गुणगौरव कार्यक्रम होणे महत्त्वाचे असून त्या माध्यमातून प्रेरणा मिळण्यासोबतच सामाजिक बांधिलकी निर्माण होते. पालकांनी विद्यार्थ्यांना करिअरची निवड करताना त्यांचा कल लक्षात घ्यावा, अभ्यास व जिद्द यांची जोड दिल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन जि. प. शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी केले. कालिका मंदिर सभागृहात झालेल्या खान्देश मराठा मंडळाच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून बच्छाव बोलत होते. बच्छाव म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे त्यासाठी पालकांनीही आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप फाउंडेशनचे प्राचार्य प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी अध्यक्ष शंकर पाटील, निंबा पाटील, नवनियुक्त कार्यकारिणीचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील, उपाध्यक्ष सुधाकर शिसोदे, सचिव अविनाश पाटील, अशोक पाटील, बी. आर. पाटील, हेमंत शिरसाठ, शिवाजी शिसोदे, संदीप पाटील, मनोज आमले, रमेश पाटील, दीपक देसले आदी उपस्थित होते. यावेळी बच्छाव यांच्या हस्ते नवनियुक्त कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. मंडळाच्या माध्यमातून दोनशे विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्मृतिचिन्ह, गुलाबपुष्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे माजी विश्वस्त पी. टी. पाटील, दहावीत १०० टक्के गुण मिळविणाऱ्या रसिका शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास रवि पाटील, सुभाष चव्हाण, देवराम सैंदाणे, नारायण पाटील, यशवंत नेरकर, भाऊसाहेब पाटील, नितीन अहिरराव, नितीन पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, श्यामकांत पाटील उपस्थित होते.