बिबट्याला जेरबंद करण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 04:09 PM2020-06-27T16:09:51+5:302020-06-27T16:11:46+5:30
सिन्नर : भक्ष्याचा शोध घेत असतानाच बिबट्याच कांदा चाळीत अडकून पडला होता. त्यानंतर चोवीस तासांनी सदरचा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अलगद जेरबंद झाल्याची घटना सिन्नर तालुक्यातील ठाणगाव परिसरातील आडवाडी शिवारात शुक्र वारी (दि. २६) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
सिन्नर : भक्ष्याचा शोध घेत असतानाच बिबट्याच कांदा चाळीत अडकून पडला होता. त्यानंतर चोवीस तासांनी सदरचा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अलगद जेरबंद झाल्याची घटना सिन्नर तालुक्यातील ठाणगाव परिसरातील आडवाडी शिवारात शुक्र वारी (दि. २६) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
तालुक्यातील आडवाडी येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अण्णा बिन्नर यांच्या गट नंबर ३३१ मध्ये घडली. बिन्नर कुटुंबिय नेहमीप्रमाणे वस्तीवर झोपी गेले होते. गुरु वारी (दि.२५) मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास बिबट्याने वस्तीवरील कुत्र्यांवर हल्ला चढवला. घराबाहेर आवाज झाल्याने कुटंबिय जागे झाले असता घरासमोरील कांदा चाळीत बिबट्याने प्रवेश केल्याचे पाहिले. बिन्नर यांनी चाळीचा दरवाजा बाहेरून बंद केला. व रात्र्ीच वस्तीवर बिबट्या आल्याची माहिती वनविभागाला दिली. रात्रीच त्याठिकाणी वन कर्मचारी दाखल झाले होते.
कांदा चाळीत गवत व लाकडाचे सरपण असल्याने तसेच चारही बाजूंनी चाळीला सरंक्षण असल्याने बिबट्या आतमध्ये लपून बसला. त्यामुळे बिबट्याला बाहेर पडणे अवघड झाले होते. दुसºया दिवशी सकाळी म्हणजे शुक्र वारी (दि. २६) नाशिक वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक आर. टी. मगदुम, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, नांदूरशिंगोटेचे वनपरिमंडळ अधिकारी प्रितेश सरोदे यांनी आडवाडी येथे घटनास्थळी धाव घेतली. वन अधिकार्यांनी परिसराची पाहणी केली असता कांदा चाळ चारही बाजूंनी बंदिस्त असल्याने मुख्य दरवाजा जवळ पिंजरा लावण्यात आला. वनविभागाच्या कर्मचार्यांनी दिवसभर या भागात तळ ठोकून होते. बिबट्याला बाहेर आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पंरतु दिवसभर बिबट्या पिंजºयात अडकला नाही. शुक्र वारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अखेर बिबट्या पिंजºयात अडकला गेला. त्यामुळे वनविभाग व परिसरातील नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सदर बिबट्या सुरक्षित असून अंदाजे तीन वर्षे वयाचा आहे. मोहदरी येथील वन उद्यानात बिबट्याला ठेवण्यात आले आहे. यावेळी कोनांबे परिमंडळाचे वनपाल पी. के. आगळे, रोहित शिंदे, किरण गोराडे, आकाश रु पवते, कैलास सदगीर आदी उपस्थित होते.