अडीच लाखांचा गुटखा पकडण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:18 AM2019-06-22T00:18:08+5:302019-06-22T00:18:45+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावरील बळी मंदिर रस्त्यावर शुक्रवारी (दि.२१) दुपारी नाकाबंदीदरम्यान वाहन तपासणी करीत असताना वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना चकवा देत चारचाकीसह पळ काढणाºया संशयितांचे वाहन अडवून सुमारे दोन लाख रुपये व ३२ हजार रुपये किमतीचा ६२ गोण्या गुटख्यासह दोन संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
पंचवटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील बळी मंदिर रस्त्यावर शुक्रवारी (दि.२१) दुपारी नाकाबंदीदरम्यान वाहन तपासणी करीत असताना वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना चकवा देत चारचाकीसह पळ काढणाºया संशयितांचे वाहन अडवून सुमारे दोन लाख रुपये व ३२ हजार रुपये किमतीचा ६२ गोण्या गुटख्यासह दोन संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
नाशिकच्या दोघा संशयितांसह चारचाकी वाहन आणि ६२ गोण्यातील दोन लाख ३२ हजार रुपयांचा गुटखा असा सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हेगारीवर वचक बसावा यासाठी पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण नाशिक शहरात दिवस-रात्र नाकाबंदी केली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत मुंबई-आग्रा महामार्गावरील बळी मंदिर चौफुलीवर शुक्रवारी नाकाबंदी सुरू असताना पांढºया रंगाच्या एरटीगा चारचाकी क्रमांक (एमएच ३९जे ३७४३) पोलिसांना चकवा देत रासबिहारी रस्त्याने पळून जाऊ लागल्याने पोलिसांना संशय आल्याने संबंधित वाहन थांबवून पोलिसांनी वाहनाची तपासणी केली.
यावेळी वाहनातून ६२ गोण्यांमध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याचे समोर आले. याबाबत आडगाव पोलिसांना माहिती देत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार यांनी संशयितांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी पाथर्डीफाटा येथील जैद शेख व भद्रकाली येथे राहणाºया फैयाज शेख अशा दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस निरीक्षक इनामदार, पोलीस शिपाई गणेश माळवाल, संदीप मालसाने यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी घटनेविषयी अन्न व औषध प्रशासनालाही माहिती देत पंचनामा केला.
शहरात सर्रासपणे गुटख्याची तस्करी
गुटखा सेवनाने आरोग्यावर होणारे घातक परिणाम लक्षात घेऊन तसेच युवा पिढीत गुटख्याची व्यसनाधीनता टाळण्यासाठी शासनाने गुटख्यावर बंदी घातली आहे. तरीही शहरात वेगवेगळ््या मार्गाने सºहासपणे गुजरात राज्यातून गुटखा आणल्याचे दिसून येत आहे. नाशिक शहरातील विशेषता भद्रकाली व जुने नाशिक भागात असलेले तंबाखू विक्रीवाले सर्रासपणे गुटखा खरेदी करून नाशिक शहरातील पान टपरी चालक ते किराणा दुकानदारापर्यंत पोहोचत असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले आहे.
अन्न औषध प्रशासन अंधारात?
नाशिक शहरात दैनंदिन लाखो रुपयांचा गुटखा चोरीछुपे या पद्धतीने आणला जात असला तरी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे गुटख्याच्या वाहतुकीबाबत तसेच नाशिक शहरात दुकानांमध्ये गुटका असल्याबाबत अन्न व औषध प्रशासन अंधारात आहे की काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. अवैधरीत्या होणाºया गुटख्याच्या वाहतूक व विक्रीवर अन्न औषध प्रशासन विभागाकडून कारवाई अपेक्षित असली तरी त्यांच्याकडून ठोस कारवाई होत नसल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाई बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.