जैन विद्यालयाचे वक्तृत्व स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 06:38 PM2019-12-20T18:38:37+5:302019-12-20T18:39:21+5:30

श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने वक्तृत्व स्पर्धेत सुयश मिळविल्याची माहिती प्राचार्य डॉ. संगीता बाफना यांनी दिली.

Success of Jain School's Speech Competition | जैन विद्यालयाचे वक्तृत्व स्पर्धेत यश

चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री कोतवाल हिने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिल्हात दुसरा क्रमांक मिळविल्याबद्दल तिचा सत्कार करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार, शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पुरु षोत्तम कडलक, सुनील आहेर आदी.

Next

चांदवड : श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने वक्तृत्व स्पर्धेत सुयश मिळविल्याची माहिती प्राचार्य डॉ. संगीता बाफना यांनी दिली.
नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी गायत्री कोतवाल हिने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्र मांक मिळवून यश मिळवले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार, नाशिक शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पुरु षोत्तम कडलक, सुनील आहेर यांच्या हस्ते कुमारी गायत्री कोतवाल हिला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल तिचे संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष अजितभाऊ सुराणा, सचिव जवाहरलाल आबड, समन्वयक शांतिलाल अलिझाड, महावीर पारख, प्रशासकीय अधिकारी पी.पी. गाळणकर, प्राचार्य डॉ.संगीता आर. बाफना, उपप्राचार्य एस.यू. समदडिया, सी.डी. निकुंभ, आर.आर. अथरे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी स्वागत केले.

Web Title: Success of Jain School's Speech Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.