मराठा हायस्कूल स्काउट-गाइडचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:15 AM2020-09-10T00:15:42+5:302020-09-10T01:17:33+5:30
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजसंस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलच्या स्काउट-गाइडच्या विद्यार्थिनींनी मागील वर्षी झालेल्या राज्य पुरस्कार निवड चाचणीत घवघवीत यश संपादन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजसंस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलच्या स्काउट-गाइडच्या विद्यार्थिनींनी मागील वर्षी झालेल्या राज्य पुरस्कार निवड चाचणीत घवघवीत यश संपादन केले.
या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य भारत-स्काउट, मुंबई व नाशिक भारत स्काउट आणि गाइड यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात स्काउट-गाइड राज्य पुरस्कार चाचणी काचुर्ली, ता. त्र्यंबकेश्वर येथे घेण्यात आली. यात मराठा हायस्कूल नाशिक येथील २२ स्काउट व २५गाइड यांनी यश मिळवले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना राज्यपालांचे पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना स्काउट मास्टर सुनील बस्ते, हेमराज गोसावी, भाऊसाहेब टोपे आणि गाइडच्या मंदाकिनी खरात यांनी मार्गदर्शन केले.