माळेगाव प्राथमिक शाळेचे नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 06:34 PM2020-10-29T18:34:25+5:302020-10-29T18:40:25+5:30
मुसळगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव या शाळेने नवोदय व पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळविले. सन २०१९-२० या सालात पार पडलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत पद्मेश दवणे या विद्यार्थ्याची निवड झाली.शिष्यवृत्ती परीक्षेत दहा विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

वर्गशिक्षिका वंदना हालवर(बर्गे)यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत पद्मेश दवणे या विद्यार्थ्याची जिल्ह्यातील खेडगाव येथील जवारह नवोदय विद्यालयात पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे.तर पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पद्मेश दवणेसह प्रियंका प्रसाद, मृणाली शिरोडकर, हेमवंत काछी, काजल चांद, प्रेम जाधव, स्वयंम काजळे, कृणाली च-हाटे, संदीप पाईकराव व नेहा कदर हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका वंदना हालवर(बर्गे )यांचे मार्गदर्शन मिळाले.
शाळेचे मुख्याध्यापक अरुण भामरे, केंद्रप्रमुख बाळासाहेब फड,माजी मुख्याध्यापिका अलका आहेर व सर्व सहशिक्षक यांचे सहकार्य लाभले.