सामुदायिक संसर्ग रोखण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 11:12 PM2020-04-16T23:12:56+5:302020-04-17T00:18:52+5:30
नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी गुरुवारी (दि.१६) सायंकाळी जारी केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील अद्ययावत आकडेवारीनुसार कोरोना बाधितांचे सॅम्पल्स पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण हे केवळ ६.४८ टक्के असून तुलनेत निगेटिव्ह सॅम्पल्सचे प्रमाण सर्वाधिक ७१.२२ टक्के असल्याचे दिसून येते, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात बहुतांश ठिकाणी प्रशासनास मोठ्या प्रमाणावर यश येत असल्याचे निवासी वैद्यकीय डॉक्टरांनी अहवालात म्हटले आहे.

जिल्हा रुग्णालयात दाखल असलेले २३५ मनपा रुग्णालयातील २३०, मालेगाव मनपा रु ग्णालयातील १७१ शासकीय रुग्णालय, मालेगाव येथील १०२ अशा ७३८ रु ग्णांचे ७४० नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ५२७ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, १६५ अहवाल प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत संशयित असलेल्या ४४२ व्यक्तींना डिस्चार्जदेखील देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनामार्फत घेण्यात येणाऱ्या खबरदारी व उपाययोजनांमुळे कोरोनाबाधित (पॉझिटिव्ह) रुग्णांची टक्केवारी ही नियंत्रित आहे. आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेने जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित (पॉझिटिव्ह) रुग्ण केवळ ११ दिवसात पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याने त्याला नुकताच १४ एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे संशयित परंतु ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आहेत अशा
रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे प्रमाणदेखील लक्षणीय आहे. त्यामुळे या आजाराला घाबरून न जाता नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे बहुतांश संभाव्य सामूहिक संसर्ग टाळण्यात प्रशासन यशस्वी होताना दिसत असल्याचे अहवालात म्हटले आहे.