विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास बाहेर काढण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 03:48 PM2018-10-08T15:48:06+5:302018-10-08T15:48:14+5:30
निफाड : निफाड येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास सुखरूपपणे बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले आहे
निफाड : निफाड येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास सुखरूपपणे बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले आहे
निफाड येथे श्रीरामनगर रोडवर नवनाथ गुंजाळ यांच्या शेतात मध्ये वस्ती करून राहतात त्यांच्या घराजवळ काही अंतरावर विहीर आहे सोमवार दि .८ रोजी सकाळी गुंजाळ यांनी त्यांच्या शेतातील विहिरीत डोकावले असता त्यांना विहिरीच्या कपारीला कोल्हा बसलेला दिसला . हि घटना श्रीरामनगरचे पोलीस पाटील रवींद्र शिंदे यांनी वन विभागाला कळवली येवला वन विभागाचे वन परिक्षेत्र अधोकारी संजय भंडारी यांच्या सूचनेनुसार , वनरक्षक विजय टेकणर,वनसेवक भय्या शेख व वनमजुर यांचे पथक गुंजाळ यांच्या शेतात दाखल झाले. वनविभागाच्या पथकाने कोल्हा ज्या कपारीत बसलेला होता त्या कपारीपर्यंत दोरखंडाला बांधलेला छोटासा जाळीचा पिंजरा सोड ला. काही वेळाने हा कोल्हा या जाळीच्या पिंजर्यात शिरला त्यानंतर दोरखंडाच्या साहाय्याने हा पिंजरा विहिरीच्या वर आण ला. या पथकाने त्या कोल्ह्यास त्याच्या अधिवासात सोडून दिले या कोल्ह्यास विहिरीबाहेर काढण्यासाठी रवींद्र शिंदे , संदीप गुंजाळ , राजेंद्र क्षीरसागर , ज्ञानेश्वर खताळे , किरण शिंदे , चिंधु गुंजाळ ,केदु शिंदे , भगवान शिंदे यांनी वन विभागाच्या पथकास सहकार्य केले .(08 निफाडकोल्ह)